शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

यापुढील लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:47 IST

राज्याची सत्ता ठरावीक लोकांपुरतीच मर्यादित आहे़ राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी या सत्तेत वंचितांना वाटा मिळाला पाहिजे़ त्यासाठीच वंचित बहुजनांची आघाडी स्थापन केल्याचे सांगत, समाजातील मोठा वर्ग, नवा समूह आज उभा राहत आहे़ त्यांना व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल़ असे सांगतानाच यापुढील लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी असेल, असे स्पष्ट प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले़

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादनवंचित बहुजनांना सत्तेत वाटा मिळवून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्याची सत्ता ठरावीक लोकांपुरतीच मर्यादित आहे़ राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी या सत्तेत वंचितांना वाटा मिळाला पाहिजे़ त्यासाठीच वंचित बहुजनांची आघाडी स्थापन केल्याचे सांगत, समाजातील मोठा वर्ग, नवा समूह आज उभा राहत आहे़ त्यांना व्यवस्थेत सामावून घ्यावे लागेल़ असे सांगतानाच यापुढील लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी असेल, असे स्पष्ट प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले़येथील कै़शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित विराट बहुजन मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी मंचावर माजी आ़ लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, माजी खा. व्यंकटेश काब्दे, विजय मोरे, जाकेर चाऊस, प्रा़डॉ़ यशपाल भिंगे, रामचंद्र येईलवाड, प्रा़ राजू सोनसळे, महेंद्र देमगुंडे, प्रदीप राठोड यांच्यासह विविध जाती घटकातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ मेळाव्याच्या प्रारंभी विविध जातींच्या पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करीत बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली़अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका केली़ भाजपाचा अजेंडा संविधानविरोधी आहे़ मात्र काँग्रेस- राष्ट्रवादीची भूमिकाही स्पष्ट नाही़ या पक्षांनी या वंचित घटकाला सोबत घेतले असते तर आज ही आघाडी उभी करण्याची गरज भासली नसती, असे सांगत ही आघाडी विशिष्ट जातीपुरती मर्यादित नाही, तर सत्तेपासून दूर असलेल्या घटकांसाठी आहे़ त्यामुळे मराठा समाजातील आर्थिक दुर्बलांनीही या आघाडीत सहभागी होवून लढा बुलंद करायला हवा़, असे ते म्हणाले़आज संघप्रणीत सरकारमुळे संविधान धोक्यात आले आहे़ मात्र देशातील बहुजनांच्या ताकदीचा अंदाज त्यांना नाही़ आम्ही संविधान वाचवू आणि त्यासोबत सत्तेतील हक्काचा वाटाही वंचितांना मिळवून देवू असे ते म्हणाले़ अ‍ॅड़ आंबेडकर यांनी यावेळी भाजपा सरकारवरही घणाघाती टीका केली़ शेजारी देश असलेल्या भूतान या छोट्याशा राष्ट्राने विकासाची संकल्पना बदलली आहे़ घर, शिक्षण, नोकरी याबरोबरच शांततेने जगणे म्हणजे विकास अशी व्याख्या त्यांनी केली आहे़ आपल्याकडे याच्या नेमकी उलट स्थिती आहे़ केवढ्या कोटीचा नफा झाला त्यावर विकासाचे मोजमाप केले जाते़ मात्र या नफ्यातील वंचितांच्या वाट्याला काय येते ? असा सवाल करीत सत्तेत बसलेल्या धर्मदांडग्यामुळे गरीब आणि श्रीमंतातील दरी आणखी रुंदावत चालल्याचे त्यांनी सांगितले़ काँग्रेसने घोषणेच्या निम्मी कामे करुन पैसे खाल्ले़ आता भाजपा तर अस्तित्वात नसलेल्या कारखान्यांना करोडोंची कर्जे देत आहे़ नुकतेच रिलायन्स कंपनीच्या जीओ या अस्तित्वात नसलेल्या विद्यापीठाला या सरकारने १ हजार कोटींचे अनुदान जाहीर केले आहे़ या विद्यापीठाची नोंद नाही, युजीसीकडे अर्ज नाही मग अनुदान कसे? आणि त्यावर काँग्रेससह इतर पक्ष गप्प का आहेत? असा प्रश्न करीत, हेच पक्ष आता आम्हाला तुम्ही यांच्यासोबत गेलातर भाजपला फायदा होईल, असे सांगत आहेत़ आम्ही वंचितांसाठी १२ जागांची मागणी केली आहे़ त्या देणार असाल तर तुमच्यासोबत अन्यथा राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार देवू, असेही अ‍ॅड़ आंबेडकर यांनी जाहीर केले़ येणाºया निवडणुकीतील लढाई मोठी आहे़ उमेदवाराची जात न पाहता त्याच्या पाठीशी आघाडी म्हणून उभे रहा, असे आवाहनही त्यांनी केले.---वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ११ जिल्ह्यांत मेळावे घेण्यात आले आहेत़ या मेळाव्यांना ओबीसीमधील छोट्या-मोठ्या जातींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे़ मुस्लिम समाजबांधवांनाही आम्ही आमची भूमिका समाजावून सांगत आहोत़ एकूणच वंचित समाज जागा होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ या एकजुटीच्या बळावरच आगामी निवडणुकांत आम्ही आमची ताकद दाखवून देवू.

- अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरdemocracyलोकशाहीSocialसामाजिक