पंधरा हजारांची चिल्लर लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:24 IST2021-09-16T04:24:03+5:302021-09-16T04:24:03+5:30
जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला जिल्ह्यात नांदेड ग्रामीण आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. लातूर फाटा ...

पंधरा हजारांची चिल्लर लांबवली
जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला
जिल्ह्यात नांदेड ग्रामीण आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. लातूर फाटा येथील वाघाळेकर पेट्रोल पंपासमोरुन माधव गोविंद बंतलवाड यांची तर लोहा तालुक्यात शिवणी जामगाव आखाड्यावरुन भुजंग विठ्ठल मेकले यांची दुचाकी लंपास करण्यात आली.
मित्रासोबत चर्चा पडली महागात
रस्त्याने जात असताना भेटलेल्या मित्रासोबत चर्चा करत असताना व्यापाऱ्याच्या दुचाकीला लावलेली ६२ हजार रुपये असलेली पिशवी चोरट्याने लांबवली. ही घटना मौजे सारखणी येथे घडली. मोतीसिंग खिरुर राठोड हे १३ सप्टेंबर रोजी मौजे सारखणी येथील आर्शिवाद चौधरी पेट्रोल पंपासमोरुन जात होते. त्याचवेळी त्यांना पंपावर चौधरी असल्याचे दिसले. त्यांनी चौधरी यांच्याजवळ दुचाकी थांबवली व आपल्याजवळील ६२ हजार रुपये रोख असलेली बॅग दुचाकीच्या हॅन्डलला लटकवली. राठोड हे चर्चेत गुंग असताना चोरट्याने दुचाकीला लटकवलेली बॅग लंपास केली. थोड्यावेळाने ही बाब राठोड यांच्या लक्षात आली. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन ठिकाणी जुगारावर धाडी
जिल्ह्यात नांदेड ग्रामीण आणि धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी जुगार अड्डयांवर पोलिसांनी धाडी मारल्या. मरघाट परिसरातील भावेश्वर नगर येथे अडीच हजार रुपये तर धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथे नागोराव शंकरचंद बोंबले यांच्या शेतातून अडीच हजार रुपये जप्त केले.