शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:19 IST

शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

किनवट/गोकुंदा : कोणतेही शासकीय काम असो, दिल्या-घेतल्याशिवाय होत नाही असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु त्यास प्रत्यक्ष कृतीतून जोड देण्याचे काम किनवट येथील महिला तलाठ्यांच्या जोडगोळीने केले आहे. शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कार्यवाही ३ जून रोजी किनवट शहरातील गोकुंदा भागात करण्यात आली.

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी तैनात असलेला पोलिस अधिकारी व त्याला सहायभूत ठरणाऱ्या खाजगी इसमाने अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने कार्यवाही केली होती. त्यास अवघे सहा दिवस झालेले असताना महसूल विभागाच्या दोन महिला तलाठ्यांना लाच घेताना एकत्रित अटक झाल्याने किनवटमध्ये खळबळ उडाली आहे. भाग्यश्री भीमराव तेलंगे वय ३४, सज्जा, निचपूर व सुजाता शंकर गवळे वय २५, सज्जा-कणकवाडी ता. किनवट असे कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत. वडीलोपार्जीत जमिनीचा फेर अर्जदाराच्या पत्नीच्या नावे लावण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कामाच्या अनुषंगाने तक्रारदार तलाठी भाग्यश्री तेलंगे यांना भेटले असता त्यांनी ४० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १७ हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबी पथकाने ३ जून रोजी सापळा रचून कार्यवाही केली. यावेळी लोकसेविका तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांना भेटण्यास सांगीतले. त्यांनी तक्रारदारांची फाईल घेवून तेलंगे यांच्याशी चर्चा करुन परत आल्यावर ठरल्याप्रमाणे पैसे देण्यास सांगीतले.

आजच निघाले होते बदली आदेशमहसूल विभागात विनंती अर्जावरुन तलाठ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. एसीबीच्या गळाला लागलेल्या तलाठी भाग्यश्री तेलंगे यांची बदली झाली होती तसेच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी अन्य तलाठी सहकाऱ्यासोबत संगनमत करुन जुन्या अर्जाचा निपटारा करुन अधिकची माया जमवण्याच्या उद्देशाने आर्थित व्यवहार केले व एसीबीच्या ट्रॅपमध्ये अलगद अडकल्या.

महसूल विभागाला ग्रहणमंत्री नरहरी झिरवळ हे दौऱ्यावर आले असता किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर या तेथे उपस्थित राहिल्या नाहीत. राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता त्यापाठोपाठ किनवट तहसीलला अधीनस्त असलेल्या दोन महिला तलाठ्यांनी लाचखोरीचा कळस रचण्याचे काम केले आहे. एकंदर पाहता जिल्ह्यापासून १५० किलो मीटर दूर असलेल्या किनवटचे नाव चुकीच्या पद्धतीने समोर आणून तेथील महसूल विभाग चर्चेत आला आहे. लाच प्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. सदर तलाठ्यांच्या घराची झडतीही सुरु आहे. एसीबीच्या पोलिस निरीक्षक प्रिती जाधव, सपोउपनि. शेख रसूल, अरशद अहेमद खान, सयद खदीर, गजानन राऊत यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागNandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी