महिला शेतकऱ्याची नांदेडमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:23 IST2019-05-30T05:23:37+5:302019-05-30T05:23:40+5:30
सतत नापिकीमुळे खर्च निघत नाही तर कर्ज कसे फिटणार या धास्तीने ५० वर्षीय महिलेने २९ मे रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली़

महिला शेतकऱ्याची नांदेडमध्ये आत्महत्या
बरबडा (जि.नांदेड): सतत नापिकीमुळे खर्च निघत नाही तर कर्ज कसे फिटणार या धास्तीने ५० वर्षीय महिलेने २९ मे रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली़ निलावती व्यंकटराव सर्जे असे मयत महिलेचे नाव असून, ती बरबडा ता. नायगाव येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक, महिंद्रा होम लोन, बचत गट या सर्वांचे मिळून एकंदरीत साडेतीन लाख रुपयाच कर्ज होते. पाच एकर जमिनीमध्ये काबाडकष्ट करूनही उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडाव? या नैराश्याच्या भावनेतून या महिलेने विषारी औषध प्राशन केले. या शेतकरी महिलेच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.