शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

पिता-पुत्राचा किरोडा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:30 IST

लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी काठावर असलेले त्याचे वडिल त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही बुडून मृत्यु झाला़ यातील मयत शेख गफारअली शेख याचा चार दिवसापूर्वीच विवाह झाला होता़

ठळक मुद्देनवस फेडण्यासाठी आल्यावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : लग्नानंतर कुटुंबियासह मुळगावी किरोडा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी आलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली़ तेलंगणातील निझामबाद येथून ते देवदर्शनासाठी आले होते़ तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला़ यावेळी काठावर असलेले त्याचे वडिल त्याला वाचविण्यासाठी गेले असता त्यांचाही बुडून मृत्यु झाला़ यातील मयत शेख गफारअली शेख याचा चार दिवसापूर्वीच विवाह झाला होता़किरोडा येथील मुळ रहिवाशी आसलेले शेख कुटूंबीय मागील अनेक वर्षापूर्वी तेलंगणा राज्यातील निझामबाद येथील उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास होते. शेख सत्तारअली शेख गफारअली (वय ६०, रा. खोजा कॉलनी, निझामबाद) यांच्या शेख गफारअली शेख सत्तारअली (वय २४) या मुलाचा २ सप्टेंबर रोजी विवाह झाला होता. त्यानिमित्त शेख कुटूंबीय त्यांच्या मुळ गावी किरोडा येथील सरवरे मगदुम दर्गा येथे देवदर्शन व नवस फेडण्यासाठी ६ रोजी आले होते. दुपारी दीड वाजेसुमारास शेख गफारअली हा पोहण्यासाठी तलावात उतरला़ परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत होता़ त्याला वाचविण्यासाठी पित्यानेही पाण्यात उडी घेतली़ मात्र दोघेही पिता-पुत्र पाण्यात बुडून मृत्यू पावले. बाजुस असणाऱ्या शेख कुटूंबीयातील महिलांनी आरडा-ओरड केली़ काहींनी तलावात उड्याही घेतल्या़ परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मयत बुडाल्याने त्यांचे शव पाण्याच्या तळाशी होते. परंतु नेमके कोठे आहेत हे कळत नसल्याने किरोड्यातील तरूण, गोताखोर व स्वत: पोलिस अधिकाºयांसह कर्मचारी तलावात उतरून शोध घेत होते. तीन साडेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचेही शव आढळले.घटनास्थळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, पो.नि. अभिमन्यु साळुंके, पो.उपनि. असद शेख, पोहेकाँ पठाण, मंडळ अधिकारी आर.जी. जहागीरदार, के.जी. भोसीकर सरपंच भीमराव जोंधळे, नगरसेवक शेख शरफोद्दीन, सय्यद मलंग आदींनी भेट दिली. मयतांचा शोध घेण्यासाठी सपोनि वैजनाथ मुंढे व पोकाँ. माधव डफडे यांनी तलावात उतरून शोध घेतला. सोबत कंधार येथील भोई समाजाचे गोताखोर नंदकिशोर बामणवाड, दाऊ मेकलवाड यांनी प्रयत्न केले. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मयतांचे शव लोहा ग्रामीण रूग्णालयात आणले होते.चार दिवसांपूर्वी विवाहकिरोडा येथील रहिवाशी असलेले शेख कुटुंबिय उदरनिर्वाहसाठी निझामाबाद येथे राहतात़ शेख गफार अली शेख याचा सहा दिवसापूर्वीच म्हणजेच २ सप्टेंबर रोजी विवाह झाला होताा़ मुळगावी सरवरे मकदुम येथे दर्शन व नवस फेडण्यासाठी ते आले होते़ मात्र तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाला़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणDeathमृत्यू