हिमायतनगर (प्रतिनिधी): नांदेड ते किनवट मार्गावर गुरुवारी दुपारी मृत्यूने भीषण झडप घातली. पवना पाटीजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एमएच २६ बीएम ८८९४ क्रमांकाची दुचाकी आणि एमएच २६ सीपी ५०८० क्रमांकाची कार यांच्यात पवना पाटीजवळ जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक गजानन लक्ष्मण पांचाळ (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले शंकर पंडितराव सर्जे देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेडकडे उपचारासाठी नेण्यात येत होते, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
तलाठ्याची कार असल्याची माहितीअपघातग्रस्त कार ही तलाठी प्रकाश लक्ष्मण तोटेवाड यांची असून, अपघात घडला तेव्हा ते स्वतः गाडी चालवत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन मदतीसाठी पुढाकार घेतला. हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
Web Summary : A car-motorcycle collision near Pawana Pati on the Nanded-Kinwat road resulted in the deaths of two young men, Gajanand Panchal and Shankar Deshmukh. The car reportedly belonged to a Talathi. Police are investigating the accident.
Web Summary : नांदेड-किनवट मार्ग पर पवना पाटी के पास कार और मोटरसाइकिल की टक्कर में गजानन पांचाल और शंकर देशमुख नामक दो युवकों की दुखद मौत हो गई। कार एक तलाठी की बताई जा रही है। पुलिस मामले की जांच कर रही है।