ईपीएस ९५ पेन्शनधारकांचे उपवास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:54+5:302021-05-24T04:16:54+5:30
विविध महामंडळे, खासगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादीमध्ये काम केलेल्या ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारक हे मागील अनेक वर्षापासून ...

ईपीएस ९५ पेन्शनधारकांचे उपवास आंदोलन
विविध महामंडळे, खासगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादीमध्ये काम केलेल्या ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारक हे मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहेत. या पेेन्शनधारकांना केवळ ३०० ते ३ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. कोरोना महामारीत पेन्शनधारकांची अधिकच परवड झाली आहे. देशात जवळपास ५ हजार ईपीएस पेन्शनधारक मृत्यू पावले आहेत. या सर्व परिस्थितीत पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून १ जून रोजी एक दिवसीय उपोषण केले जाणार आहे. देशातील ६७ लाख पेन्शनधारक आपापल्या घरी आपल्या कुटुंबीयासोबत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपास करणार आहेत. या उपवास आंदोलनाचे फोटो लोकसभा मतदारसंघातील खासदारांना पाठविण्यात येणार आहेत. या आंदोलनात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांनीसुद्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एस. एन. अंबेकर, जी. बी. मस्के, साहेबराव गंभिरे, शंकरराव लोकरे, पंढरीनाथ बोकारे, दिगंबर पावडे, बी. एम. मुंगल, क्रांतीकुमार शर्मा, बी. आर. बनसोडे, बी. एम. देशमुख, खंडेराव नाईक आदींनी केले आहे.