वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:46+5:302020-12-28T04:10:46+5:30
केळी पिकावर प्रादुर्भाव नांदेड : कोरोना संकटात जिल्ह्यात केळी पिकांना मागणी नव्हती. अनेक शेतकऱ्यांची केळी झाडावरच वाळून गेली. या ...

वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त
केळी पिकावर प्रादुर्भाव
नांदेड : कोरोना संकटात जिल्ह्यात केळी पिकांना मागणी नव्हती. अनेक शेतकऱ्यांची केळी झाडावरच वाळून गेली. या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड, भोकर आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होते.
पीक कर्ज देण्याची मागणी
नांदेड : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कंधार तालुक्यातील बारूळ शाखेतून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार काशीबाई बालाजी बस्वदे यांनी केली. काशीबाई बस्वदे यांचे यापूर्वीचे ४५ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. त्यामुळे पुन्हा कर्ज देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, काशीबाई बस्वदे यांच्यासह बालाजी बस्वदे यांचा अर्जही बँकेने प्रलंबित ठेवला आहे. पीक कर्ज देण्याची मागणी त्यांनी केली.