मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 03:37 AM2020-10-04T03:37:25+5:302020-10-04T03:37:39+5:30

सूक्ष्म सिंचनात औरंगाबाद विभाग राज्यात दुसऱ्या स्थानावर

Farmers in Marathwada are now becoming high-tech | मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

मराठवाड्यातील शेतकरी आता होतोय हायटेक

Next

- विशाल सोनटक्के 

नांदेड : मागास म्हणून ओळखल्या जाणाºया मराठवाड्यातील शेतकरीही परिस्थितीवर मात करीत हायटेक होत आहेत. पाणी बचतीचे महत्त्व
ओळखून तो मोठ्या संख्येने सूक्ष्म सिंचनाकडे वळत आहे. राज्यातील २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सद्य:स्थितीत सूक्ष्म सिंचनाखाली आले असून, यात २७.७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणत औरंगाबाद महसूल विभाग राज्यात दुसºया स्थानावर आला आहे.

प्रत्येक शेतकºयाच्या शेतास पाण्याची उपलब्धता करुन देणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून पीक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळावे असा शासनाचा प्रयत्न राहिला आहे. २०१९ अखेरपर्यंत राज्यातील १७ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली तर ६ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली असे एकूण २४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. यामध्ये नाशिक महसूल विभाग राज्यात अव्वल आहे. औरंगाबाद दुसºया स्थानावर असून कोकण शेवटच्या क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण सिंचनाच्या तुलनेत ठिबक व तुषार या दोन्ही पद्धतीद्वारे सिंचित होणारे क्षेत्र १७ टक्के एवढे आहे.

महसूल विभागनिहाय सूक्ष्म सिंचनाची स्थिती
महसूल विभाग ठिबक सिंचन तुषार सिंचन एकूण (हे.) टक्के क्षेत्र (हे.) क्षेत्र (हे.)
नाशिक ६४९४६४ ६४२५८ ७१३७२२ २९.४८
औरंगाबाद ४४८७९४ २०६५६१ ६५५३५५ २७.७
अमरावती १९५५७४ २९७९७१ ४९३५४५ २०.३९
पुणे ३९००३० ५१८२६ ४४१८५६ १८.२५
नागपूर ३२३०८ ६९७१५ १०२०२३ ४.२१
कोकण १३९७५ ३१९ १४२९४ ०.६०
एकूण १७३०१४५ ६९०६५० २४२०७९५ १००

Web Title: Farmers in Marathwada are now becoming high-tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.