शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

शेतकऱ्याने केला हायटेक जुगाड;जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 09:28 IST

अवलिया तरुण शेतकऱ्यांने बनवली चार्जिंग बाईक...!

- गोविंद टेकाळे 

अर्धापूर ( नांदेड ) : -  तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अवलियाने जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून तब्बल दोन वर्षांनी चार्जिंग वर चालणारी बाईक बनवली आहे. फक्त १४ रुपयांमध्ये १०० किमी अंतर पार करता येत आहे.

देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठ्या समस्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्सचा पर्याय स्वीकारत आहे. अशातच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकरी कुटुंबातील युवा शेतकऱ्याने प्रदूषण मुक्त चार्जिंगची मोटारसायकल बनवत शेतातील कामे फुले आदी बाजारपेठेत व शेतातील दळणवळणासाठी चार्जिंग बाईक बनवली आहे.

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावात रहात असलेल्या ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर या ३० वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी मोटारसायकल तयार केली आहे. फक्त १४ रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल १०० किमीचे अंतर पार करता येते. ही मोटारसायकल बनवण्यासाठी बॕटरीच्या दर्जानुसार २६ ते ४० हजार रुपये खर्च येतो. पिंपळगाव महादेव शिवारात पारंपारिक पद्धतीने शेती न करता विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे शेती करतात.गत दोन वर्षांपासून लॉकडाऊन, लग्न समारंभ आदी कार्यक्रम छोटेखानी होत असल्याने फुल शेतीतुन दळणवळणाचा खर्च निघत नसल्याने तरूण शेतकऱ्यांने लॉकडाऊन मध्ये चार्जिंगवरील मोटारसायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प करत विजेवर चालणारी मोटारसायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्याच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

◾पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीपेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र चार्जिंगवर बनवलेली मोटारसायकल पहिल्यांदाच बनवण्यात आली. ही सायकल पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठी गर्दी करत आहे.

◾१४ रूपयात १०० किमी प्रवासचार्जिंग मोटरसायकल बनवण्यासाठी ४० हजार रुपये खर्च आला. मोटार ७५० होल्ट , बॅटरी ४८ होल्ट ,चार्जर,कंट्रोलर,लाईट, एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक यांच्यासह वेल्डींगचा वापर करत ही मोटारसायकल बनविण्यात आली आहे.

◾फसलेले ट्रॕक्टर ओढण्याची शक्तीपुढील काळात या चार्जिंग मोटारसायकलवर आणखी संशोधन करून २००० व्हॕटची मोटार बसवल्यास फसलेले ट्रॕक्टर ओढून काढता येते. जेव्हढे जास्त होल्टेज मोटार तेवढे जास्त वजन ओढल्या जाते.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर