शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुष्काळी अनुदानातून हजार रुपयांची कपात झाल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:55 IST

उमरीत बँक व्यवस्थापकाला शेतकऱ्यांचा घेराव

उमरी (जि. नांदेड) : दुष्काळ व अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या  खात्यावर जमा झालेल्या दुष्काळी अनुदानातून एक हजार रुपये कपात करण्यात येत आहेत़ त्यामुळे संतप्त झालेल्या उमरी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी बँक व्यवस्थापक डी़ आऱ देशमुख यांना घेराव घातला.

सध्या जिल्हा बँकांच्या शाखांमधून गतवर्षीच्या दुष्काळी अनुदानाचे वाटप होत आहे.  हे वाटप होत असताना कमीत कमी एक हजार रुपयांची रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय अनुदान मिळणार नाही असा नियम बँकेने सुरू केला. संगणकीय पद्धतीवरुन तशी फीडींग  झालेली   आहे. असे कारण सांगून एक हजार रुपये कपात करण्याचा  प्रकार सुरू झाला. याबाबत शेतकऱ्यांनी व्यवस्थापक देशमुख यांना जाब विचारला़ परंतु या नियमात कुठलाही बदल होणार नाही, असे उत्तर व्यवस्थापकांनी दिले़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे जाऊन कैफियत मांडली.

तहसीलदार माधव बोथीकर यांनी लगेच  व्यवस्थापक देशमुख यांना पाचारण केले. अनुदानाची रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यात थेट जमा करावी, ज्या शेतकऱ्याचे बँकेत बचत खाते नसतील त्यांचे जनधन योजनेखाली झिरो बॅलन्स खाते उघडून त्या खात्यात मदत रक्कम जमा करण्यात यावी, या रकमेतून   कोणतीही थकबाकी वसूल करू नये, आदी सूचना दिल्या. या सूचनेला व्यवस्थापकांनी दाद दिली नाही़ जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून काही आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत मला काही करता येणार नाही़ अशी कबुली  देशमुख यांनी दिली़ 

शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशाराशेतकऱ्यांनी याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावरून तहसीलदारांनी बँकेला लेखी पत्र दिले. मात्र, त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. एक दिवसाच्या अवधीनंतर या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव पुयड सिंधीकर,  संजय राठोड,  बाबूराव शिंदे,  मारुती पोलादे,  शेषराव निकलपुरे, संजयकुमार अमृतवाड, रामराव राठोड, पांडुरंग हामंद,  बालाजी राठोड, किशन शिंदे, बाबूराव मुंडकर, नामदेव राठोड, दिगंबर चिंताके, अनिल राठोड,  दत्तात्रेय कारेगावे, दिलीप राठोड,  वामन राठोड, गणपत कारेगावे  आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :fundsनिधीbankबँकNandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी