शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांना रोपे मिळण्यास पुन्हा अडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:43 IST

नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये तर हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आॅक्टोबरमध्ये दिले आहे़ त्यामुळे रोपे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कहिमायतनगर : तालुक्यातील शेतक-यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ मात्र दोन वर्षांपासून लाभार्थी शेतक-यांना रोपे मिळाले नाहीत़ दरम्यान, नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये तर हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आॅक्टोबरमध्ये दिले आहे़ त्यामुळे रोपे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे़२०१६-१७ मध्ये हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ कृषी कार्यालयाकडून मंजुरी मिळवून शेतात खड्डे करुन शेणखताने भरले होते़ त्याचे मस्टर काढले, मात्र कृषी विभागाकडून दोन वर्षांपासून रोपे मिळाले नाहीत़ ही शेतक-यांची व्यथा ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून दखल घेऊन १० सप्टेंबर रोजी रोपाचे आवंटन पत्र पाठवले़ त्यानंतर हिमायतनगर कृषी कार्यालयाकडून विजय नर्सरी लिंबगाव ता. नांदेड या नर्सरीचे फळबागेचे परमिट वाटप केले होते़ परमिट मिळाल्यानंतर शेतक-यांनी चारचाकी वाहन भाड्याने करुन रोपे आणण्यासाठी लिंबगाव गाठले़ नर्सरीतील मालकास परमिट देऊन रोपाची मागणी केली़मात्र नर्सरी धारकाने रोपे आमच्याकडे उपलब्ध नाहीत़ नांदेड कृषी कार्यालयाकडून जूनमध्ये पत्राद्वारे रोपाची मागणी केली होती़ त्या प्रक्रियेला तब्बल चार महिने उलटून गेले असल्याने आम्ही आपली वाट पाहून रोपे दुसरीकडे विकून टाकली, असे सांगितले़अन शेतक-यांना रोपे मिळालेच नाहीतहिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ कृषी कार्यालयाकडून मंजुरी मिळवून शेतात खड्डे करुन शेणखताने भरले होते़ त्याचे मस्टर काढले़ मात्र कृषी विभागाकडून दोन वर्षांपासून रोपे मिळाले नाही़शेतकºयांचा हा प्रश्न ‘लोकमत’ने समोर आणला होता़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून दखल घेऊन १० सप्टेंबर रोजी रोपाचे आवंटनपत्र पाठवले आणि लगेच हिमायतनगर कृषी कार्यालयाकडून विजय नर्सरी लिंबगाव ता.नांदेड या नर्सरीचे फळबागेचे परमिट वाटप केले होते़लिंबगाव येथील नर्सरीतून रोपे आणण्यासाठी शेतकरी गेले असता सदरील नर्सरी धारकाने आमच्याकडे रोपे उपलब्ध नसल्याचे सांगितले़ त्यामुळे शेतक-यांना रोपे न घेताच परत फिरावे लागले़हे सर्व वरिष्ठ कार्यालयाकडून घडलेशेतक-यांनी येथील कृषी अधिकारी गडंबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून आमच्या कृषी कार्यालयात आवंटन पाठवल्याने आम्ही ताबडतोब परमिट लाभार्थ्याना दिले़ यात माझा व हिमायतनगर कृषी कार्यालयाचा काय दोष ? हे सर्व वरिष्ठ कार्यालयाकडून घडले़नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये आणि हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आक्टोबरमध्ये दिले़ या गोंधळामुळे शेतक-यांना वाहन भाड्यासाठी प्रत्येकी ४ हजार रुपये विनाकारण खर्च करावे लागले़ अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतक-यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत़२६८३० रोपांचे परमिटनरेगाअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमधून कलमे-रोपे लावण्यासाठी एकूण ८२ शेतकरी फळबागेचे लाभार्थी आहेत़ त्यात ६३़५५ हेक्टर जमीन आरक्षित झाली होती़ त्यामध्ये आंबा, सीताफळ, मोसंबी, आवळा, लिंबू आदींचा सहभाग होता़मोसंबीचे रोपे सोडली तर इतर रोपांची पूर्तता झाली नल्याचे सांगितले जाते़ आजस्थितीला ५८़४० हेक्टर जमिनीसाठी २६८३० रोपाचे परमिट दिले असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी