शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

१५०० लोकांच्या गावात १५ हजार जन्मनोंद घोटाळा; नांदेड पोलीसांनी झारखंडहून ५ जणांना उचललं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:26 IST

सावळेश्वर जन्म नोंद घोटाळा: नांदेड पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई; रांचीतून एका महिलेसह पाच जणांना अटक

बारुळ (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सावळेश्वर (ता. कंधार) बनावट जन्म नोंदणी प्रकरणाचा उलगडा करण्यात उस्माननगर पोलिसांना मोठे यश आले आहे. या रॅकेटचे मुख्य धागेदोरे झारखंडमध्ये असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी रांची येथून चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

१५०० च्या गावात १५ हजार जन्म!२०११ च्या जनगणनेनुसार सावळेश्वर गावाची लोकसंख्या अवघी १५०० आहे. मात्र, २०२५ मध्ये 'सीआरएस' प्रणालीचा गैरवापर करून चक्क १५ हजार ५७० बनावट जन्म नोंदी करण्यात आल्याचे उघड झाले. हा आकडा लोकसंख्येच्या तुलनेत दहा पटीने जास्त असल्याने खळबळ उडाली होती. या नोंदींमध्ये प्रामुख्याने झारखंड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश असल्याचे संशय आहे.

रांचीमध्ये १० दिवस पोलिसांचा 'डेरा'भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तपास यंत्रणा वेगाने हलली. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रांचीमध्ये १० दिवस मुक्काम ठोकून आरोपींचा मागोवा घेतला. या तांत्रिक तपासाअंती पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना आता नांदेडमध्ये आणण्यात आले आहे.

आंतरराज्य रॅकेटचा संशयकेवळ नांदेडच नाही, तर यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्येही अशाच प्रकारच्या संशयास्पद नोंदी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे रॅकेट राज्यभर पसरले आहे का? आणि यामागे नेमका कोणता मोठा उद्देश आहे? याचा तपास आता सुरू झाला आहे. या कारवाईमुळे बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Birth certificate scam busted; five arrested from Jharkhand.

Web Summary : Police uncovered a birth certificate scam in Nanded, arresting five from Jharkhand. 15,000 fake entries were made in Sawaleshwar, population 1,500. Investigation continues into potential interstate racket.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी