तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 12:33 PM2021-08-09T12:33:19+5:302021-08-09T12:37:17+5:30

Olympics 2020 : धर्माबाद येथील चैतन्य भंडारे यांनी तीन वेळा नापास होवूनही जिद्दीच्या जाेरावर ट्रक चालवून पैशाची जुळावाजुळव केली.

Failed three times, now three companies in Japan; Nanded's son links Indian team to Olympics | तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा

तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा

googlenewsNext
ठळक मुद्देनेहमीच मोठी स्वप्न पाहणाऱ्या या तरूणाने औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज, भोपाळ, गोव्यात शिक्षण घेवून जपान गाठले.आईने आणि त्यांचे गुरू डी. डी. कुलकर्णी यांनी नेहमीच विश्वास दाखविला. त्यामुळे आपण यश संपादन करू शकलो

नांदेड : बारावीत तीन वेळा नापास झालेल्या धर्माबादच्या तरूणाने अटकेपार झेंडा फडकावला आहे. जपानमध्ये दोन कंपन्यांचा मालक असलेला चैतन्य भंडारे ( Chaitanya Bhandare ) हा तरूण सध्या टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ( Olympics 2020 ) भारतीय संघ आणि ऑलिम्पिक ऑर्गनाझेशन कमिटीमधील दुवा म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ( Failed three times, now three companies in Japan; Nanded's son links Indian team to Olympics) 

नांदेडच्या भूमिपुत्राचा प्रवास थक्क करणारा आहे. धर्माबाद येथील चैतन्य भंडारे यांनी तीन वेळा नापास होवूनही जिद्दीच्या जाेरावर ट्रक चालवून पैशाची जुळावाजुळव केली. नेहमीच मोठी स्वप्न पाहणाऱ्या या तरूणाने औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज, भोपाळ, गोव्यात शिक्षण घेवून जपान गाठले. आईने आणि त्यांचे गुरू डी. डी. कुलकर्णी यांनी नेहमीच विश्वास दाखविला. त्यामुळे आपण यश संपादन करू शकलो असे भंडारे यांनी सांगितले. त्यांचे संशोधन पाहूनच जॅपनिज सरकारची मेक्स नावाची शिष्यवृत्ती मिळाली. संशोधन कार्यानंतर त्यांनी पाच वर्षे जपानध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. आवड असल्याने वालिंटियर ॲक्टिव्हीटीमध्ये सहभागी झालो. आपल्याच देशातील काही उद्योजकांनी कंपनी काढण्याचा सल्ला दिला. त्यानूसार कंपनी काढून विविध बिझनेस जोडले. याच कार्यामुळे सर्वांसोबत जोडला गेला आणि आज आपल्या भारतीय संघाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे तो अभिमानाने सांगतो.

१५ जुलैपासूनच संघाच्या सेवेत
ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी १५ १५ जुलैपासून चैतन्य भंडारे कार्यरत आहेत. त्यांच्यावर ऑलम्पिक ऑर्गनाझिंग टीम आणि भारतीय खेळाडूंमधील दुवा म्हणून स्वयंसेवकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे पार पाडत असताना प्रत्येक भारतीय खेळाडू, संघांस सेवा देण्याचे, त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले आहे.

पालकमंत्र्यांकडून चैतन्यचे कौतुक
टोकोयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे मुख्य स्वयंसेवक जबाबदारी सांभाळल्यांतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चैतन्य भंडारे यांचे कौतुक केले. चैतन्य भंडारे हे धर्माबादचे सुपूत्र आणि जपानमधील उद्योजक आहेत. रविवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांनी ट्वीट करुन चैतन्य भंडारे यांचे अभिनंदन केले. मुख्य स्वयंसेवकाची भूमिका सक्षमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन. एक नांदेडकर म्हणून आम्हाला चैतन्याचा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीत चैतन्य यांचे जपानपर्यंत पोहचणे आणि मायदेशासाठी येथेही योगदान देणे प्रेरणादायी असल्याचे चव्हाण म्हणाले.

Web Title: Failed three times, now three companies in Japan; Nanded's son links Indian team to Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.