शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:38 IST

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

- मारोती चिलपिपरे कंधार (नांदेड) : अखंड मेहनत आणि जिद्दीने सगळं काही साध्य करता येतं असं म्हणतात. सातत्य पूर्ण मेहनत केली असता कोणतंही अपयश आलं तरी ते आपल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही. अपयश आलं म्हणून हार मानून न जाता पुन्हा हिमतीने उभं राहून तो प्रवास करावा लागतो तेव्हाच यश हाती लागतं. आज आपण अशाच एका हरहुन्नरी तरुणाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बारावीमध्ये चार वेळा नापास होऊनसुद्धा हार न मानता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)  परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर येथील शेतकरी पुत्र आकाश सुरेश शिंदे हा बारावीला सलग चार वेळा नापास झाला. मात्र, हार न मानता तो परीक्षा देत राहिला. पाचव्या वेळेस त्याने बारावी उत्तीर्ण केली. मोठ्या कष्टाने बारावी पास झालेल्या आकाश आता आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं यासाठी झपाटून गेला. अपयश पचवून यश मिळालेल्या आकाशने MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळवायचा चंग बांधला. त्यासाठी आकाशने २०१७ पासून स्पर्धा परीक्षेचे तयारी सुरू केली. तसेच मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी प्रवेश घेतला.

दरम्यान, २०१९ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आकाशची लढाई सुरू झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आकाशने दिवसरात्र एक केला. मागील अपयश विसरून झोकून देऊन अभ्यास करण्याचा सल्ला आई वडिलांनी देत मोठी हिंमत आकाशला दिली. दरम्यान, आकाश स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले येथेच त्याने जीव तोडून मेहनत केली. आखरे आकाशची जिद्द फळाला आली अन् त्याची एमपीएससी च्या माध्यमातून महसूल सहाय्यक पदी निवड झाली. आकाशने यश संपादन केल्यानंतर ही घटना न केवळ त्याच्या कुटुंबासाठी तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

गावात जल्लोषात स्वागतप्रत्येकाची अनेक स्वप्न असतात. पण हि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड लागते. याच मेहनतीच्या जोरावर गुंटूर गावातील आकाश शिंदे याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परिक्षेसाठी आकाशने अखंड मेहनत घेतली. स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवले. अखेर आकाशच्या पदरी यश पडले. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून गावी पोहोचताच आकाशचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद गावभर साजरा केला.

यशासाठी संयम हवादहावी-बारावीत एखादा गुण इकडे तिकडे झाला तरी मुलं थेट आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचताना दिसतात. पण दहावी-बारावी ही आयुष्याची अंतिम परीक्षा नव्हे. मी बारावीत एक नव्हे, चार वेळा सपशेल नापास झालो. पण जिद्द सोडली नाही त्यानंतर पाचव्या प्रयत्नातून बारावी पास झालो. २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर आता यश मिळाले. तुम्ही हि स्वप्न पाहा. पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड द्या. त्यासोबत ते स्वप्न पुर्ण होण्याची वाट पाहण्यासाठी तुमच्याकडे तसाच संयम देखील हवा. दहावी-बारावीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश नक्की मिळेल.- आकाश सुरेश शिंदे, गुंटूर

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाNandedनांदेडFarmerशेतकरी