कृषी शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:06+5:302021-04-19T04:16:06+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेतंर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी शिक्षणक्रमांच्या प्रमाणपत्र, पदविका व पदवी शिक्षणक्रमांकरीता ...

कृषी शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षा लांबणीवर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेतंर्गत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी शिक्षणक्रमांच्या प्रमाणपत्र, पदविका व पदवी शिक्षणक्रमांकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १० मे २०२१ या कालावधीत व अंतिम लेखी परीक्षा १५ ते २५ मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती माहिती पुस्तिकेतील वेळापत्रकात दिलेली होती; परंतु सध्या संपूर्ण राज्यात कोविड-१९ चा संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढत असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण काेविड बाधित होत आहेत. त्यामुळे मे २०२१ मध्ये पूर्वनियोजित परीक्षा युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व शासनाचे वेळोवेळी येणारे निर्णय विचारात घेऊन जुलै-ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
सदर परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात किंवा ऑनलाईन घ्याव्यात याबाबतचा निर्णय त्यावेळची कोराेनाची परिस्थिती विचारात घेऊन घेतला जाईल, असेही मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कृषी, उद्यान विद्या पदवी शिक्षणक्रमाचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्रांवर १ ते १० मे या कालावधीत एका स्पायरल प्रतीत सादर करावे. पदवी प्रकल्पावरील तोंडी परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीत आपापल्या अभ्यास केंद्रांवर होतील. त्यांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी १५ दिवस आधी कळविण्यात येईल, असेही मुक्त विद्यापीठाच्या प्रशासनाने म्हटले आहे.