जिलेटीन वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट; गाडीच्या ठिकऱ्या, घटनास्थळी २० फुटाचा खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:40+5:302021-06-02T04:15:40+5:30
यावेळी शेतावर असलेले बाळू बोडवान यांच्या हाताला मार लागून ते जखमी झाले. गणपत येलगुरे यांच्या हायब्रीड ज्वारीचे मोठे नुकसान ...

जिलेटीन वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट; गाडीच्या ठिकऱ्या, घटनास्थळी २० फुटाचा खड्डा
यावेळी शेतावर असलेले बाळू बोडवान यांच्या हाताला मार लागून ते जखमी झाले. गणपत येलगुरे यांच्या हायब्रीड ज्वारीचे मोठे नुकसान झाले. चांदू आगलावे यांच्या काकडा शेती स्फोटाने उद्ध्वस्त झाली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की जवळपास १० ते १५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावात हा आवाज पोहोचला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, स्फोटाची माहिती घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या घटनेत जिलेटिनच्या कांड्या होत्या का अन्य कोणते पदार्थ होते, हे माहिती करून घेण्यासाठी घटनास्थळीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणा सर्व दृष्टीने तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.
(फोटो कॅप्शन -पांढरवाडी-मुदखेड रस्त्यावरील शिवारात जिलेटिन वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट होऊन गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या असून घटनास्थळी वीस फुटांचा खड्डा पडला.)
(फोटो नंबर - ०१एनपीएच जेयुएन-१० जेपीजी)