शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील वाळू घाटात आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:49 IST

हा वाळू घाट सुरु झाल्यापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे.

बिलोली ( नांदेड ) : तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरील सगरोळी गावालगतच्या वाळू घाटात आज दुपारी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.  

गेल्या महिनाभरापासून हा वाळू घाट सुरु झाला आहे. येथे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा केल्याने पाच ते दहा फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. अशाच एका पाण्याने भरलेल्या खड्यात हा मृतदेह आज आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी बालाजी सातमवार यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेहावर अत्यंविधी केला. हा वाळू घाट सुरु झाल्यापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. आता येथे मृतदेह आढळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू