शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मनपा सहाय्यक आयुक्तांच्या शैक्षणिक अर्हतेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना महासभेने सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली होती़ त्यानंतर आयुक्तांनी त्यांची पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़ याबाबत शासनाने १५ मार्च रोजी आदेश काढून अधिकाऱ्यांची पदोन्नती कायम ठेवत त्यांची शैक्षणिक अर्हता तपासून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत़

नांदेड : महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांना महासभेने सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली होती़ त्यानंतर आयुक्तांनी त्यांची पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़ याबाबत शासनाने १५ मार्च रोजी आदेश काढून अधिकाऱ्यांची पदोन्नती कायम ठेवत त्यांची शैक्षणिक अर्हता तपासून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत़महापालिकेतील प्रकाश येवले, संजय जाधव आणि अविनाश अटकोरे यांना महासभेने सहाय्यक आयुक्त या पदावर बढती दिली होती़ त्यानंतर या पदोन्नतीच्या विरोधात काही जणांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या़ या तक्रारीनंतर आयुक्त लहुराज माळी यांनी या अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती रद्द करीत त्यांना मूळ पदावर आणले होते़त्यामुळे या तिन्ही अधिका-यांना मोठा धक्का बसला होता़ त्यानंतर अधिकाºयांनी याबाबत शासनाकडे दाद मागितली होती़ त्यावर १५ मार्च रोजी शासनाचे आदेश धडकले़ ५ एप्रिल १९९९ अन्वये सहाय्यक आयुक्त पदासाठी शैक्षणिक अर्हता नमदू केलेल्या तीन पदांसाठी आहे़ ती उर्वरित सर्व सहाय्यक आयुक्त पदासाठी लागू आहे किंवा कसे? तसेच सहाय्यक आयुक्त संवर्गातील पदोन्नतीचे पदे व सरळसेवेची पदे यानुसार शैक्षणिक अर्हता तपासणी करुन तसा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे महापालिकेकडून आता सहाय्यक आयुक्तांच्या शैक्षणिक अर्हतेची तपासणी होणार आहे़विशेष म्हणजे, यातील प्रकाश येवले हे जानेवारी महिन्यातच सेवानिवृत्त झाले आहेत़ तर संजय जाधव आणि अविनाश अटकोरे हे दोघेजण महापालिकेत कार्यरत आहेत़दरम्यान, महापालिकेत यापूर्वीही दिलेल्या पदोन्नतीबाबत अशाचप्रकारे वादंग उठले होते़ तर दुसरीकडे आकृतिबंधाचा विषयही बरेच दिवस चर्चेत होता़ यामध्ये बरेच राजकारण सुरु होते़ काही जणांनी थेट मंत्रालयात तक्रारी केल्या होत्या़नांदेडकरांवर ‘अ’ दर्जाचा कर चुकीचानांदेड वाघाळा महापालिकेला ‘ड’ दर्जा असताना नागरिकांकडून मात्र ‘अ’ दर्जाचा कर वसूल केला जात आहे़ या जाचक करात सुधारणा केल्यास टॅक्स कृती समिती न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल, असा इशारा माजी आ़डॉ़डी़आऱदेशमुख यांनी दिला आहे़ त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे़ महापालिका आयुक्तांनी नांदेडकरांवर एकसूत्र पद्धतीने मालमत्ता कर आणि घरपट्टी लावली आहे़ ती मुंबईच्या धर्तीवर आहे़ नांदेड महापालिका ‘ड’ वर्गात मोडते. त्यामुळे जादा लावलेला कर कमी करावा आणि गत चार वर्षांत वसूल केलेला कर परत द्यावा़ महापालिका सध्या चार दिवसांआड पाणी देत आहे़ परंतु, पाणीकर मात्र पूर्ण वसूल करण्यात येतो़ याबाबत मालमत्ताधारकांची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे़ असेही निवेदनात नमूद केले आहे़ निवेदनावर डॉ़डी़आऱदेशमुख, अ‍ॅड़राणा सारडा, नारायण पुय्यड, संभाजी पाटील पाटोदेकर, बाबा डोकोरे यांच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका