शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'इव्हिएम मशीनमध्ये १५ लाखात फेरफार करून देतो' ; आमदारांना एसएमस करणारा अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:18 PM

पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देया तरुणाने हिमाचल प्रदेशामधील ४३ आमदारांना असे मेसेज पाठविलेदहा लाख मतदानापूर्वी आणि पाच लाख निवडणूक निकालानंतर दिल्यास १५ लाखात मतदान यंत्रात फेरफार करून देतो

नांदेड - पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे. या तरुणाने हिमाचल प्रदेशामधील ४३ आमदारांना असे मेसेज पाठविले असून, नुकत्याच पार पडलेल्या नांदेड मनपा निवडणूकीवेळीही त्याने काही उमेदवारांना असेच मेसेज पाठविल्याचे पुढे आले आहे. सचिन दत्ता राठोड  ( रा. दयाळ धानोरा ता. किनवट ) असे या तरुणाचे नाव असून, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविदयालयाचा पदविधर आहे.  सध्या नांदेड शहरातील सुंदर नगर येथे रहात असून, स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.

चोरीच्या सिमकार्डचा वापर करून हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाच्या नावे त्याने त्या राज्यातील ४३ जणांना एसएमएस पाठविले. दहा लाख मतदानापूर्वी आणि पाच लाख निवडणूक निकालानंतर दिल्यास १५ लाखात मतदान यंत्रात फेरफार करून तुमचा विजय निश्चित करून देतो. असा मजकूर त्याने पाठविले. निवडणूक आयोगाच्या नावाने आलेल्या मेसेजमुळे उमेदवारही चक्रावले. दरम्यान या प्रकरणी हिमाचल प्रदेशातील सिमला येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना सदर मेसेज पाठविणाऱ्या तरुणाचे मोबाइल लोकेशन तेलंगणा, हैद्राबाद असे दिसून आले. अधिक तपासाअंती हा तरूण नांदेडचा असल्याचे उघड झाले. पैशाच्या आमिषामुळे असे एसएमएस पाठविल्याचे या तरूणाने कबूल केले असून. या तरुणाने असे आमिष दाखवून कोणाकडून पैसे उकळले का? याचा तपास पोलिसांनी सुरू केल्याचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी सांगितले

टॅग्स :Nandedनांदेड