शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:38 IST

मागील आठवड्यात लोहा नगरपालिकेची निवडणूक पार पडली. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचा दारून पराभव करत घवघवीत यश संपादन केले.

लोहा : मागील आठवड्यात लोहा नगरपालिकेची निवडणूक पार पडली. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचा दारून पराभव करत घवघवीत यश संपादन केले. दरम्यान १७ डिसेंबर रोजी दुपारी ईव्हीएम मशीनयंत्राचे सील असलेल्या अ‍ॅड्रेस टॅग तहसील कार्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या बालाजी मंदिर परिसरात रस्त्यालगत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.लोहा पालिकेसाठी ९ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर मतमोजणी १० रोजी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी दुपारी बालाजी मंदिराच्या पाठीमागील बाजूस एका रस्त्यालगत मोकळ्या मैदानात ईव्हीएमचे सील असलेल्या चिठ्ठ्या (अ‍ॅड्रेस टॅग) आढळून आल्या. शहरातील काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू संगेवार, नवनिर्वाचित नगरसेवक पंचशील कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी जिवन पाटील चव्हाण, माजी नगरसेवक अनिल दाढेल, युवकचे पांडुरंग शेटे आदींनी भेट देऊन पाहणाी केली. तसेच लोहा पोलीस ठाण्याचे पोउपनि असद शेख, वसंत केंद्रे, भास्कर मुंडे यांच्यासह शहरातील अनेकांनी धाव घेतल्याने बालाजी मंदिर परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी स्थानिक पोलिसांनी निवडणूक विभागाच्या आदेशाविना पंचनामा करणार नसल्याची भूमिका घेतली. न.प. निवडणुकी दरम्यान यासंदर्भात लवकरच न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनु संगेवार यांनी सांगितले. यासंदर्भात लोह्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विठ्ठल परळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. तर दुसरे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा न.प.चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा मोबाईल बंद होता.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस