पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST2021-09-26T04:20:38+5:302021-09-26T04:20:38+5:30

महिला पाेलिसांची ड्युटी कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महिला पाेलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी हाेणार आहे. ...

Everyday fun with the police mother! | पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत !

पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत !

महिला पाेलिसांची ड्युटी कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महिला पाेलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी हाेणार आहे. त्यातच कुटुंबीयांना अधिक वेळ देता येईल याचा आनंद जास्त आहे.

आता आईसोबत रोज खेळता येणार

शाळा नसल्याने घरी राहून माेबाइल, टीव्ही बघत बसावे लागते. आई आता लवकर येणार आहे. आई ड्युटीवर असताना तिची वाट बघावी लागायची. ती आता लवकर घरी येणार असल्याने आनंद हाेत आहे.

- साध्वी रवि तारू, सिडकाे

आई पाेलीस आहे याचा आनंद आहेच, पण ती कामामुळे जास्त वेळ घरी राहत नाही. आता आई लवकर घरी येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मला खूपच आनंद हाेत आहे. शाळा नसल्यामुळे घरी खेळायचे तरी किती असा प्रश्न हाेता. आता आईसाेबत खेळता येईल.

- अवनी नितीन सेलूकर

Web Title: Everyday fun with the police mother!