शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

निवडणूक आयोगाचा प्रत्येक हालचालींवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:45 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर आहे. यासोबतच निवडणूक आयोग उमेदवारासह प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक मतदारसंघात व्हिडीओ व्हिजिलन्स टीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर आहे. यासोबतच निवडणूक आयोग उमेदवारासह प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. यासाठी प्रत्येक विधानसभानिहाय वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या आहेत.उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडीओ व्हिजिलन्स टीम (व्हीएसटी) गठित करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करेल. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती योग्य आहे की नाही, याची उलट तपासणी एसओआरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दोघांच्या खर्चाच्या आकड्यात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ८२ संवेदनशील मतदान केंदे्र्र आहेत. यामध्ये ५२ केंद्र्र नागपूर शहर व ३० रामटेक लोकसभा मतदारसंघात आहेत. या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. संवेदनशील परिसरात मतदान शांततेत पार पडावे यासाठी सीआयएसएफ व सीआरपीएफच्या तुकड्यांची साथ मिळणार आहे. सीआयएसएफचे पथकही जिल्ह्याला याकामी प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने याकामी आवश्यक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.याशिवाय प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या चमू गठीत करण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून आयोग प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहे.१,५४० व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईनिवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था करायम राखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ५४० असामाजिक तत्त्वांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून जिल्हा प्रशासन विभागाला देण्यात आली आहे. नागपूर शहरात ५०५ तर ग्रामीण भागात १०३५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.प्रचारसभा-रॅलीसाठी ५२ अर्जप्रचार सभा, रॅली, जनसंपर्क कार्यालयाच्या मंजुरीसाठी निवडणूक विभागाकडे ५२ अर्ज प्राप्त झाले. यात सर्वच राजकीय पक्षांचा समावेश आहे. यातील ४५ अर्जांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित अर्ज प्रलंबित असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.साडेतीनशे शस्त्र जमापरवाना असलेले शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ३५० शस्त्रे जमा झाली आहेत. नागपूर शहरात २७५ तर ग्रामीण भागातील ७५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.अचानक वाहन तपासणीनिवडणुकीच्या काळात दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत यासाठी नागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करताना व्हीडिओ शुटींगही केले जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर