शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही माफियांकडून जिल्ह्यात वाळू उत्खनन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:02 IST

परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देमुदखेड तालुक्यातील बारड परिसरातील प्रकार चर्चेचा विषय

बारड : परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी जिलेटीनद्वारे संक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आला होता, तरीही उत्खनन सुरु असल्याने हा प्रकार चर्चेचा ठरला आहे.आजही मुदखेड तालुक्यातील वासरी, खुजडा, टाकळी, शंखतीर्थ, आमदुरा, देवापूर, येळी, महाटी या गावांतून गोदावरी पात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू बाहेर काढण्याचे काम रात्री-बेरात्री सुरु आहे. हा रेतीसाठा शेतात करण्यात येत आहे. काही घाटांवर मशीनच्या सहाय्यानेदेखील वाळू काढणे सुरु आहे. एकीकडे वाळू बंद मात्र उपसा कायम चालू असल्याने चोरट्या मार्गाने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. शासनाचे वाळूधोरण नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून रात्री उशिरापर्यंत विनापावती वाळू पार्सल होत आहे. वाळू उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर मातीत जात असला तरीही प्रशासनाचे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. काही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे निव्वळ थोतांड चालविले आहे. दुसरीकडे उमरी तालुक्यातील घाटावरील वाळूही मुदखेड तालुक्यात विनापावती येत आहे.माचनूर येथे तीन जेसीबी जप्तलोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी : सगरोळी परिसरातील मांजरा नदी पात्रातील रेतीघाटात उत्खनन चालु असतांना माचनुर रेती घाटाला बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी ७ मे रोजी दिलेल्या भेटी दरम्यान तीन जेसीबी जप्त केल्या आहेत.या झालेल्या कारवाईमुळे ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत. सगरोळी परिसरातील सगरोळी व माचनुर हे रेती घाट चालु झालेले आहेत. चालु झालेल्या पहिल्याच दिवशी महसुल प्रशासनाने ओव्हर लोडिंगच्या नावाखाली कांही ट्रक जप्त करुन कारवाई करीत दंड आकारण्यात आला होता. तर सगरोळी शासकिय रेती घाटावारील बनावट पावत्यांच्या नावाखाली जिल्हाधिकारी यांनी देगलुर येथे २७ वाहनावर दंडात्मक कारवाई केली. चार दिवसानंतर माचनूर घाटावर ही कारवाई केली आहे. नव्यानेच रूजू झालेले उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले , सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद कांबळे, तलाठी गजानन चमकुरे यांचा सहभाग होता.दरम्यान प्रशासनाने सुरू केलेल्या या ठोस कारवाईनंतर अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.वाळू तस्करीचा व्यवसाय जोरातमुदखेड तालुक्यातील वासरी, खुजडा, टाकळी, शंखतीर्थ, आमदुरा, देवापूर, येळी, महाटी आदी गावच्या गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने वाळू तस्करीचा व्यवसाय जोरात सुरूजिलेटीनद्वारे संक्शन पंप उद्ध्वस्त करण्याची कारवाई निव्वळ थोतांड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी