शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

पुन्हा संपवले जीवन... 'एक मराठा-लाख मराठा; माझे बलीदान वाया जाऊ नये'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 09:51 IST

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

गोविंद टेकाळे 

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : -  हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका चोवीस वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.  'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे. माझे हे बलीदान वाया जावु नये असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्या जवळ आढळून आली आहे. शुभम सदाशिव पवार असे मयत तरुणाचे नाव आहे. 

हदगाव तालुक्यातील वडगाव येथील मूळ रहिवासी असलेला २४ वर्षीय शुभम सदाशिव पवार प्लंबरचे काम  करतो. तसेच काम करत करत शिक्षण ही घेतो. शनिवारी सकाळी रेल्वेने मुबंई येथुन नांदेड येथे आला. शुभम याने त्याच्या वडीलांना फोन द्वारे माहीती दिली की, मी नांदेडच्या नमस्कार चौक परीसरात बहीनीकडे जावुन फ्रेश होऊन गावाकडे येतो असे म्हणाला होता. परंतु 'शुभम' हा रात्री सात वाजेपर्यत घरी आला नाही, फोन लावले असता फोन उचलत नाही. त्यानंतर नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली.  शुभम हा सकाळ पासुन घरी आलाच नाही. असे तामसा पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी सांगितले. त्यावेळी पोलिसांनी शुभम यांचे मोबाईलचे लोकेशन चेक केले असता अर्धापुर परीसरात मोबाईल लोकेशन आहे असे सांगितले. शोध घेतला असता  शुभम हा अर्धापूर येथील तामसा रोड वरील नरहरी मंगल कार्यालयच्या बाजुला झाडीमध्ये आढळून आला.  त्याच्या जवळ विषारी औषधाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळली. ज्या चिठ्ठीमध्ये 'एक मराठा लाख मराठा' , मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे, माझे हे बलीदान वाया जावु नये मी शुभम सदाशिव पवार असा मजकुर आढळून आला.

घटनास्थळी अर्धापुर पोलीसांनी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी केशव पवार यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मस्के हे करत आहेत.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड