रक्षाबंधनाच्या दिवशीच निघाली भावाची अंत्ययात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 17:23 IST2017-08-07T17:23:49+5:302017-08-07T17:23:49+5:30

शाम जाधव (२३) या तरुणाचा डेंग्यू मुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. शामवर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आज रक्षाबंधनाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

The end of brother's brother-in-law on the day of Raksha Bandhan | रक्षाबंधनाच्या दिवशीच निघाली भावाची अंत्ययात्रा 

रक्षाबंधनाच्या दिवशीच निघाली भावाची अंत्ययात्रा 

ऑनलाईन लोकमत

नांदेड : मुखेड तालुक्यातील फकिरा तांडा येथील शाम जाधव (२३) या तरुणाचा डेंग्यू मुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. शामवर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आज रक्षाबंधनाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

शाम याचे सावरगाव पि.येथे किराणा दुकान होते. नुकतेच त्याचे लग्न झाल्याने त्याने दुकान बंद करून कामानिमित्त पुणे गाठले होते. तेथेच त्यास अचानक ताप आली असता तो गावी आला. मुखेड व नांदेड ला उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने डाॅक्टरच्या सल्या नुसार त्यास अौरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात अाले. येथेच उपचारदरम्यान रविवारी मध्यरात्री त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्यावर आज सकाळी फकिरा तांडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. शामची बहिण शीला यांनी आम्ही रक्षाबंधनाची तयारी करत होतो आणि अचानक आमच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळ्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या पश्चात आई ,वडील,पत्नी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.  

Web Title: The end of brother's brother-in-law on the day of Raksha Bandhan