शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी आल्याने उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:09 IST

वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासापार्डी, शेणी, देळूब, कामठा, कोंढा, बामणीचा पाणीप्रश्न सुटला

पार्डी : बारा महिने तुडुंब वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा चिंताजनक प्रश्न उभा राहिला होता. यासंदर्भात पार्डी व देळूब येथील नागरिकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे नदीला पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर दुस-याच दिवशी पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, हे पाणी पार्डी नदीपर्यंत पोहोचल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी नदी, नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर बांधण्यात आले होते. परंतु, नदीला पाणी नसल्याने नळाला पाणी येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भागातील विहीर बोअरने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने विहिरीत पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते.दरम्यान, पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून नदी काठावरील पार्डी, शेणी, देळूब, कामठा बु, कोंढा, देळूब बु , बामणी, शेलगाव बु , शेलगाव खु , पिंपळगाव, सांगवी, मेंढला, निजामपूरवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पार्डी गावालगत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत गावतळ्याचे काम करण्यात आले. या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली आहे. पार्डी परिसरातील गावांना या तळ्याचा फायदा होणार आहे.तीन वर्षांपूर्वी चार बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयांनाही या पाण्याचा आता फायदा होणार असल्याने पार्डीसह परिसरातील गावांतील शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे़शेतक-यांची एकजुटइसापूरच्या पाण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांनी एकजुट दाखवित पैनगंगा नदीपात्रात अनेक दिवस आंदोलन केले होते़ त्यात आता दोन्ही विभागातील नऊ गावांना पाणी पोहोचलेच नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत़ दोन्ही विभागाच्या शेतकºयांनी एकजुट दाखवित तहसीलवर धडक दिली़ किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी प्रशासनाने पाणी देण्याची आवश्यकता व्यक्त होत होती़नऊ गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाहीविदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील ९० गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर शेतक-यांनी १५ दिवस पैनगंगा नदीपात्रात आंदोलन केले़ त्यानंतर इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आले़ परंतु, हे पाणी नऊ गावांपर्यंत पोहोचलेच नाही़ इसापूरचे पैनगंगा नदीत सोडलेले पाणी विदर्भातील पिंपळगाव, पेंधा, लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड तांडा तर मराठवाड्यातील कौठा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ या नऊ गावांत पोहोचलेच नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या नऊ गावांतील ग्रामस्थांनी उमरखेड तहसील कार्यालयावर धडक मारली होती़ यावेळी माजी आ़ विजयराव खडसे यांनी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता व आ़राजेंद्र नजरधने यांच्याशी संवाद साधून पाणी या गावापर्यंत पोहोचेपर्यंत ते बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली़ यावेळी रोहिदास राठोड, प्रकाश वाघ मुरली, देवराव गोफणे, रमेश नाईक, युवराज जाधव, बळीराम देवकत्ते, राजू पाटील भोयर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई