शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुखेड मतदारसंघातील कर्मचारी केंद्रावर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ३४१ मतदान केंद्रांवर ३१ झोनल आॅफिसरसह १ हजार ३६४ कर्मचारी काम करणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम व तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्दे३४१ मतदान केंद्र १ हजार ३६४ कर्मचारी काम करणार

मुखेड : लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ३४१ मतदान केंद्रांवर ३१ झोनल आॅफिसरसह १ हजार ३६४ कर्मचारी काम करणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम व तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले.मुखेड कंधार मतदारसंघात नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यंत्रणा सज्ज झाली आहे. १६ एप्रिल रोजी मुखेड येथून ८३ किनवट मतदार संघासाठी १४० कर्मचारी, ८४ हदगाव मतदारसंघासाठी ११० कर्मचारी, ८५ भोकर मतदारसंघासाठी २४८ कर्मचारी, ८६ नांदेड उत्तर मतदारसंघासाठी १११ कर्मचारी, ८७ नांदेड दक्षिण मतदार संघासाठी १०४ कर्मचारी, ८८ लोहा मतदारसंघासाठी ८ कर्मचारी, ९९ नायगाव मतदारसंघासाठी ८३ कर्मचारी तर ९० देगलूर मतदारसंघासाठी ८९ कर्मचारी असे लोकसभेतील ८ मतदार संघासाठी मतदान केंद्रावर काम करण्यासाठी एकूण ८९३ कर्मचारी, मुखेड आगाराच्या २३ एसटी बसने व एक क्रूझर वाहनाने रवाना झाले आहेत.त्याचबरोबर मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये ३४१ मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. यावर ३१ झोनल आॅफिसरसह प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, १ साहाय्यक केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी असे एकूण १ हजार ३६४ कर्मचारी काम पाहणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले असून या मतदान केंद्रात १ हजार ५०४ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी १ हजार ४८६ कर्मचारी उपस्थित होते तर १८ कर्मचारी अनुपस्थित होते. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा समावेश होता.नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुखेड मतदारसंघातील एकूण २ लाख, ७६ हजार ५६६ एवढे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ लाख ४५ हजार ३३० पुरुष, तर १ लाख ३१ हजार २३२ स्त्रिया व इतर ४, व सैनिक मतदार ५२१, आणि अपंग मतदार १ हजार ७९ एवढे मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत .याकामी उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार काशिनाथ पाटील, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, पी.डी.गंगनर, एस. एस. मामीलवाड, आर.आर. पदमावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी.जी.पोत्रे, गटशिक्षणाधिकारी राम भारती, विस्तार अधिकारी बी. एम. पाटील, एस. एच. झंपलवाड, व्ही. एस. पाटील, एच़ एस़ पाटील, व्ही़ व्ही़ माकणे, तहसील कार्यालयाचे श्रीमती एस़ जोशी, वाय.एम.एळगे, के.व्ही.महाडीवाले, संदीप भुरे, निवडणूक विभागाचे यु.डी.मुकाडे, प्रशांत लिंबेकर, एस.एस.पानपट्टे, एस.डी.कुसुमकर, बी.आर. रेनगुंटवार, मास्टर ट्रेनर एस़ एस़ खोचरे, ए.जी.बोइनर, बलभीम चावरे, मधुकर चव्हाण, अरविंद येवतीकर काम पाहत आहेत.तर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, पोलीस निरीक्षक नरसिंग आकूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेसंदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.चार मतदान केंद्र संवेदनशील घोषितमुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघात ४ मतदान केंद्र संवेदनशील असून मागील निवडणुकीत या मतदान केंद्रावर निवडणुकीसंदर्भात गुन्हे दाखल झाल्यामुळे या मतदान केंद्राला संवेदनशील घोषित केले आहे. यामध्ये जिरगा येथील २ केंद्र, कोडग्याळवाडी येथील १ केंद्र तर परतपूर येथील एका केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElectionनिवडणूकEmployeeकर्मचारी