शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:56 IST

 वन विभागाकडे ना उपाययोजना ना मदत

ठळक मुद्दे खबरदारीची गरज  शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न

कासराळी (नांदेड ) : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी बु.येथील गेटकेवार पिता-पूत्रांचा शेतातील धुऱ्याच्या कडेने रानडुकरापासून पिकाच्या बचावासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनात वीज प्रवाह सोडल्याने मंगळवारी धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेच्या पश्चात  या अनुषंगाने निर्माण झालेल्या बाबींचा नैसर्गिक आपत्तीत समावेशच नाही. तर दुसरीकडे या घटना आगामी काळातील संभाव्य घटना टाळण्यासाठी ना वनविभागाकडे उपाययोजना आहे ना महसुलची मदत मिळणार नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मंगळवारी बामणी बु.येथील रजनीकांत गेटकेवार (४०) हे मुलगा विजय (१४) याच्यासमवेत स्वत:च्या शेतातील मूग पिकास आणि मसाई पुजण्यास गेले होते. शेतालगतच असलेल्या संजय गेटकेवार यांच्या शेतीतील धु-यावर तारांच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने या पितापूत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ मात्र ज्या कारणांनी हा विद्युत प्रवाह सोडला ते केवळ रानडुक्करे आणि अन्य वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीपासून बचावासाठी असला तरी हा  प्रकार ग्रामीण भागात सर्रासपणे केला जातो. वास्तविक अशी घटना नैसर्गिक आपत्तीत गणली जात नाही असा सरकारी निकष आहे. मात्र वनविभागांकडून या प्राण्यांवर बंदोबस्तासाठी कसलेही उपाययोजना नाहीत ना अश्या घटनातील शेतक-यांना मदत. केवळ पिकांच्या नुकसानीची मदत मिळते इतकेच तर दुसरीकडे महसुल विभागांकडून विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडूनही घटना नैसर्गिक आपत्तीत येत  नसल्याने आर्थिक मदतही मिळत नाही. तर तिसरीकडे वीज वितरण कंपनी अशा घटनांची जबाबदारी घेत नाही ना वीज प्रवाह सोडणा-या शेतक-यांना प्रतिबंध करत नाही.मात्र यात गाफील शेतक-यांचा हकनाक बळी जातो अशी ही विसंगती आढळून येते. मात्र अशा भविष्यात घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आणि जागृतीची गरज आहे. ज्यामुळे भविष्यात अश्या घटना टाळणे शक्य होईल. अनेकांचे जीव वाचतील 

अधिकारी म्हणतात ...नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जिवीतहानी जसे वीज पडणे आणि पूर येणे अशा आपत्तीसाठी महसुल विभागाची मदत आहे - डॉ.ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार, बिलोली़वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा पिकांचे नुकसान झाल्यासच वनविभाग संबंधितांना आर्थिक मदत करते़ मात्र अपघातजन्य किंवा अन्य बाबींतील आर्थिक व जीवीत नुकसानीसाठी वनविभाग मदत करीत नाही -शिवानंद कोळी, वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूरशेतक-यांना अशा घटनांना सामोरे जावे लागते याचे खेद आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून खबरदारी ही घेणे ही गरजेचे आहे  -विजय घुगे, तालुका कृषी अधिकारी, बिलोली़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDeathमृत्यूRevenue Departmentमहसूल विभाग