शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:58 AM

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.शनिवारी नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारयादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.निवडणुकीमध्ये मतदारयादी, मतदार आणि आता ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनला महत्त्व आले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक निवडणूक नवीन समजून प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील बदलही आत्मसात करावे, असा सल्ला दिला.यावेळी मतदानस्तरीय केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या जबाबदाºया, त्यांची कामे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. उमरीचे सहायक मतदान अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायगावच्या तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा नांदे, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांनीही यावेळी आपापल्या तालुकाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार नोंदणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला.नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार शंकर नरावाड, नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी नाव नोंदविण्याची शेवटची संधीजिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती, आक्षेप, दावे स्वीकारण्यात येत आहेत. मतदारांना नावनोंदणी, नाव वगळणी, दुरुस्तीही ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. निवडणूक काळात चुका दर्शविण्यापेक्षा वेळेतच दुरुस्ती करुन घेतली तर निश्चित लाभदायक ठरणार आहे याची सर्व मतदारांना बीएलओंनी जाणीव करुन द्यावी. त्यातून पुढील काळातील वाद टाळता येतील असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूक