शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

‘वतन वेलफेअर सोसायटी’ने जोडले आठ हजार संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:47 IST

समाजातील विविध घटकांतील कुटुंबियांमध्ये होणाऱ्या कुरबुरी सोडवून पुन्हा संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे काम ‘वतन’ मार्फत सुरू आहे.

अनुराग पोवळे ।नांदेड : लहान-मोठ्या कुरबुरीतून सुरू असलेल्या सुखी संसाराचा गाडा ‘तलाक’पर्यंत पोहोचू नये, त्यातून समाजाचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी ‘वतन वेलफेअर सोसायटी’ पुढे आली असून समाजातील विविध घटकांतील कुटुंबियांमध्ये होणाऱ्या कुरबुरी सोडवून पुन्हा संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे काम ‘वतन’ मार्फत सुरू आहे. या सामाजिक उपक्रमाला समाजातील अनेक घटकांकडून मदत मिळत आहे.कधी सासू-सुनेच्या तर कधी नवरा-बायकोच्या भांडणातून कौटुंबिक वाद निर्माण होतात. याच वादातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. समाजात अशा उद्ध्वस्त होणाºया कुटुंबांची संख्या वाढत आहे. हे पाहून २०१० मध्ये स्थापन झालेल्या वतन वेलफेअर सोसायटीने घरातील कुरबुरी सोडविण्याचे काम हाती घेतले. शहरातील मीलरोड भागात एक कार्यालयही सुरू केले. या कार्यालयात प्रारंभी मुस्लिम समाजातील कौटुंबिक वाद समोर आले. त्यानंतर इतर धर्मिय कुटुंबही आपले वाद घेऊन येऊ लागले. या वादात तोडगा काढण्यात ‘वतन’ला यशही आले. घरातील लहान-मोठ्या कुरबुरीतून हुंडाबळीच्या केस केल्या जात होत्या. हे चित्र ‘वतन’ने बदलले. ‘वतन’कडे आलेल्या ८ हजार २०० प्रकरणांत तडजोड घडवण्यात यश आले. वाद मोठे असतील तर पोलीस, कायदेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. प्रसंगी मौलवींचा आदेशही दोन्ही कुटुंबियांना देवून संसार चालवण्याचे निर्देश देण्यात आले.सोसायटीकडून समाजातील गरीब कुटुंंबियांना मदतही केली जात आहे. आजघडीला दोन वर्षांपासून ८५० कुटुंबियांना दरमहा अन्न-धान्य दिले जात आहे. १०० विवाहही लावून देण्यात आले आहेत.‘वतन’ सोसायटीमध्ये शनिवार, रविवारी दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावून मार्ग काढला जातो. वतन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष गफार खान, नगरसेवक शेर अली, साबेर चाऊस, अथर उल इमान, सिकंदर मौलाना, मसूद खान, अब्दुल गफार, रईस खतीब, फेरोज लाला, नासेर लाला, आसिफ नदवी मौलाना, मुस्ताक मेमन, याकूब मेमन आदी या उपक्रमासाठी मदत करीत आहेत.

  • तोडगा नाही तर तलाकचा निर्णयही अनेक कुटुंब घेतात. ‘वतन’कडे आलेल्या प्रकरणात काही वाद सोडविण्यापलीकडे पोहोचतात. त्यावेळी मात्र तलाकशिवाय पर्याय नसतो. जवळपास २४४ प्रकरणांत तोडगा न निघाल्याने तलाकचा निर्णय घेण्यात आला.
टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिकFamilyपरिवार