पंचतारांकित शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:49+5:302021-02-24T04:19:49+5:30
या बैठकीत दिवसभराचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला होता. आधार नोंदणी, आरटी प्रवेश प्रक्रिया, यू-डायस प्लस माहिती, शाळांना नळ ...

पंचतारांकित शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा
या बैठकीत दिवसभराचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला होता. आधार नोंदणी, आरटी प्रवेश प्रक्रिया, यू-डायस प्लस माहिती, शाळांना नळ जोडणी, जिल्हा वार्षिक योजनाची निर्मिती, प्रलंबित बांधकामाचा आढावा, कर्मचारी सेवा पुस्तके, दीर्घ रजा प्रकरणे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, बेटी बचाव-बेटी पढाव अंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम, वैद्यकीय देयके, सेवानिवृत्ती प्रकरणे, माहिती अधिकार प्रकरणे, शिक्षकांच्या संदर्भातील सर्व प्रकारची प्रकरणे, दहावी-बारावी परीक्षा केंद्राची निश्चिती, संचमान्यता, मानव विकास योजना, आदर्श शाळांची निश्चिती, फिट इंडिया, स्वाध्याय उपक्रम, एनजीओंचा शिक्षण कार्यात सहभाग, न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा, स्कूल हेल्थ प्रोग्रॅम आदी संदर्भात सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून सर्व योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा फिडबॅक घेण्यात आला.
२८ फेब्रुवारीपर्यंत माझे कार्यालय सुंदर कार्यालय आणि माझी शाळा सुंदर शाळा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी यावेळी दिले. या कार्यसत्रात उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, लेखाधिकारी अमोल आगळे, सहाय्यक लेखाधिकारी योगेश परळीकर, अधीक्षक बळीराम येरपूलवार यांनीही मार्गदर्शन केले.