शिक्षण हे सामाजिक भान जतन करण्याची जाणीव निर्माण करणारे साधन - केशव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:08+5:302021-07-28T04:19:08+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत ...

शिक्षण हे सामाजिक भान जतन करण्याची जाणीव निर्माण करणारे साधन - केशव देशमुख
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शारदा भवन एज्युकेशन संस्थेचे कोषाध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर तर प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, मातृभाषे बरोबरच इंग्रजी भाषेचे ज्ञान, संवाद कौशल्य व संगणकीय ज्ञान आत्मसात करून त्याद्वारे जगाशी जोडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे यश कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, प्रयत्नाला जिद्द, चिकाटी, कष्ट, ध्यास व धेय्याची जोड देऊन विविध प्रकारची कौशल्य अवगत केल्यास आजचा विद्यार्थी मजबुतीने स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चित्रपट, पत्रकारिता, संगीत क्षेत्राबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर घडविण्यासाठी निर्माण होणाऱ्या संधी याबद्दलची माहीती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना त्या संदर्भात अवगत केले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र प्रमुख प्रा. गौतम दुथडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. बी.एस्सी. तृतीय वर्ष उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रथमेश तेलंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन परीक्षा सह केंद्रप्रमुख प्रा. डॉ. एम. एम. व्ही. बेग यांनी केले.