कोरोनाकाळात ९ हजार ३०० मजुरांच्या हाताला मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:40+5:302021-05-01T04:16:40+5:30

प्रत्येक हाताला काम व कामानुसार दाम हे रोहयो योजनेचे ब्रीदवाक्य आहे. १०० दिवस रोजगार पुरविण्याची हमी या योजनेत आहे. ...

During the Corona period, 9,300 laborers got jobs | कोरोनाकाळात ९ हजार ३०० मजुरांच्या हाताला मिळाले काम

कोरोनाकाळात ९ हजार ३०० मजुरांच्या हाताला मिळाले काम

प्रत्येक हाताला काम व कामानुसार दाम हे रोहयो योजनेचे ब्रीदवाक्य आहे. १०० दिवस रोजगार पुरविण्याची हमी या योजनेत आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून या योजनेच्या सक्षमीकरणाला खीळ बसली आहे. अनेक गावांत मजुरांना काम मिळत नाही. तर, काही ठिकाणी केलेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे यंदा सुरू असलेल्या उन्हाळी कामावरच्या मजुरांना वेळेवर पैसे देण्याची गरज असून त्यादृष्टीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सर्वाधिक कामेही किनवट, माहूर, उमरी या तालुक्यांत केली जात आहेत. सर्वाधिक कामही किनवट, माहूर, उमरी या तालुक्यांत केली जात आहेत.

चौकट- जिल्ह्यात मराग्रारोहयो अंतर्गत १६ तालुक्यांत कामे सुरू आहेत. ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण या यंत्रणेच्या वतीने ही कामे केली जात आहेत. ग्रामपंचायतीचे सुरू असलेल्या कामावरील मजुरांची संख्या पुढीलप्रमाणे - अर्धापूर- ६२०, भोकर- २४, बिलोली -२६६, देगलूर -६३८, धर्माबाद-६८९, हदगाव-७६६, हिमायतनगर-२७४, कंधार- ५०२, किनवट- २७०, लोहा - १४९, माहूर - १३०१, मुदखेड- २११, मुखेड- ३६४, नायगाव- ७३६, नांदेड- ३९७, उमरी-३४४.

चौकट- जिल्ह्यात तालुकानिहाय सुरू असलेल्या कामांची संख्या. - अर्धापूर-३५, भोकर- ७, बिलोली-२८, देगलूर -३०, धर्माबाद-२८, हदगाव- ६८, हिमायतनगर- २०, कंधार-७४, किनवट- ९३, लोहा-६६, माहूर- २२२, मुदखेड- ४४, मुखेड- ३४, नायगाव-११६, नांदेड- ६४, उमरी-३४.

Web Title: During the Corona period, 9,300 laborers got jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.