शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 10:36 IST

एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 नांदेड : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना गुरुवारी  उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही तासांतच ‘एमआयएम’नेदेखील ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात साेेडून भाजपचे कमळ हाती धरले. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले होते; परंतु काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने अनुभवी चेहरा पुढे करत त्यांना ताकद देण्याचे काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली होती; मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. तद्नंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. 

काँग्रेसने गुरुवारी सकाळी दिवंगत वसंतराव यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उभे राहणार असल्याची घोषणा केली. 

भाजपने मात्र, अद्याप ही पोटनिवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असले तरी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी खासदार प्रतापराव चिखलीकर या दोघांची नावे चर्चेत आहेत.  

२०१९ मध्ये मतविभाजन ठरले होते निर्णायकमोदी लाटेत २०१४ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करणाऱ्या अशोक चव्हाण यांना २०१९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांना ४ लाख ८६ हजार ८०६ मते मिळाली होती. तर चव्हाणांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली होती.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली होती. या ठिकाणी झालेल्या सेक्युलर मतांच्या विभाजनामुळे अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

वंचित आणि जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार का?- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास लाखांचा पल्लादेखील पार करता आला नव्हता. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जरांगे फॅक्टरमुळे काँग्रेसला यश मिळविणे सोपे झाले होते. - मात्र, आता पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारीने काँग्रेसने टेन्शन वाढले असून वंचित आघाडी काय भूमिका घेणार? तसेच, जरांगे फॅक्टरही आता किती निर्णायक ठरेल याचीही उत्सुकता आहे.  

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक 2024Nandedनांदेड