शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्लासेसमुळे महाविद्यालये ओस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:20 IST

बारावीत कागदावर शेकडो प्रवेश; चार भरारी पथके नेमली

- विशाल सोनटक्के नांदेड : इयत्ता अकरावी-बारावीचे अनेक विद्यार्थीमहाविद्यालयात न जाता खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.नांदेडसह लातूर जिल्ह्यात खाजगी क्लासेसचा बोलबाला आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतलेली असून कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्यास सुरुवात केली आहे. उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश झाले आहेत का, हे या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. कमीत कमी चार भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने बजावले आहेत.शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांचा त्यात समावेश असेल. संच मान्यतेनुसार मंजूर तुकड्या, अधिकतम प्रवेश क्षमता, शाखानिहाय दिलेले प्रवेश तसेच प्रवेशानुसार विद्यार्थी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहतात का? याची पडताळणी हे पथक करेल. ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक मुलांना प्रवेश दिल्याचे स्पष्ट होईल, अशा उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांंची यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात येणार असून विभागीय उपसंचालकांमार्फत ती यादी शासनाकडे जाणार आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश; विद्यार्थ्यांना परीक्षेस मज्जावक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी त्यांच्या स्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करायचे आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना सोयीनुसार नजिकच्या मंजूर प्रवेशित क्षमतेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांना प्रवेश घेण्यास सांगावे. एखाद्या विद्यालयाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिलेले असल्यास विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेस बसता येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी