लॉकडाऊनमुळे वाहतूकदारांना संसाराचा गाडा ओढता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:58+5:302021-05-17T04:15:58+5:30
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बहुतांश बांधकाम व्यवसाय बंदच आहेत. त्यामुळे याचा परिणाम ...

लॉकडाऊनमुळे वाहतूकदारांना संसाराचा गाडा ओढता येईना
लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बहुतांश बांधकाम व्यवसाय बंदच आहेत. त्यामुळे याचा परिणाम मालवाहतूक गाड्यांवर हाेत आहे.
चौकट- एक महिन्यापासून आमच्या गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत. आठवड्यात एक-दोनच भाडे मिळत आहेत. त्या पैशांतून बँकेचे हप्तेही देता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर तयार झाला आहे.
- माणिक मोहिते, वाहनचालक
चौकट- कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. कुटुंबाच्या गरजा भागविता येत नाहीत. गाडी एकाच जागी उभी असल्याने जीवनच ‘ब्रेक’ झाले आहे. - राजू पवार, वाहनचालक
चौकट- फर्निचर, बांधकाम साहित्याची दुकाने बंद असल्याने गाड्यांना भाडेच मिळत नाही. त्यामुळे बँकेचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता आहे. मागील वर्षीपासून हीच परिस्थिती आहे. दिवाळीनंतर चित्र बदलले होते. मात्र, आता पुन्हा तेच दिवस आले आहेत.
- शिवराम चव्हाण, वाहनचालक