लॉकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:04+5:302021-04-15T04:17:04+5:30
गावात जमिन नसल्याने आणि शेतात काम जमत नसल्याने वॉचमन म्हणून नांदेडात दुकानावर आहे. परंतु, लाॅकडाऊनमुळे नौकरी गेली. मागील काही ...

लॉकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी
गावात जमिन नसल्याने आणि शेतात काम जमत नसल्याने वॉचमन म्हणून नांदेडात दुकानावर आहे. परंतु, लाॅकडाऊनमुळे नौकरी गेली. मागील काही दिवसांत एकवेळी तरोडा भागातील शिवभोजन केंद्रावर जावून जेवन करतो. शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. परंतु, गरजूंनाच जेवन द्यावे, कोणीही येवून डब्बा घेवून जातो, हे थांबवावे. - विलास गायकवाड.
शहरात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आलो असून एका कापड दुकानावर अर्धवेळ काम करून अभ्यास करतो. परंतु, लाॅकडाऊनमुळे काम गेले आहे. त्यात मेसही बंद आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर जेवन करतो. परंतु, नेहमीच या ठिकाणी जेवन मिळेल, असे काही नाही. कधी कधी हॉटेलमध्ये खिचडी खावूनदेखील दिवस काढावा लागतो. - आनंदा राजुरकर
भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरर्निवाह चालवितो. घरात कोणीही कर्ता पुरूष नाही. परंतु, शासनाने मोफत जेवन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे माहिती झाल्याने घरातील काही जणांना तरी त्या केंद्रातून जेवन मिळेल. उर्वरित आम्ही घरी मिळेल ते करून खावू. - पंचफुला खोबरे.