शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

घराच्या भिंतीजवळ कचरा जाळल्याच्या कारणावरून माथेफिरुचा गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:45 IST

शहरातील वर्कशॉप भागातील एसटीच्या विभागीय कार्यालयाशेजारी राहत असलेल्या आसिफ पठाण नामक तरुणाने घराच्या भिंतीजवळ कचरा जाळल्याच्या क्षुल्लक कारणावरुन डबल बोअर बंदुकीतून गोळी झाडली

ठळक मुद्देवर्कशॉप भागात वक्फ बोर्डाचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एऩडी़पठाण यांची तीन मजली इमारत आहे़ परिसराची स्वच्छता करुन एका कोपऱ्यात तो कचरा जाळण्यात येत होता़

नांदेड : शहरातील वर्कशॉप भागातील एसटीच्या विभागीय कार्यालयाशेजारी राहत असलेल्या आसिफ पठाण नामक तरुणाने घराच्या भिंतीजवळ कचरा जाळल्याच्या क्षुल्लक कारणावरुन डबल बोअर बंदुकीतून गोळी झाडली़ यावेळी एसटी कार्यालयातील सुरक्षा रक्षक व इतर तीन कर्मचाऱ्यांसोबत त्याची झटापट झाली़ सुदैवाने गोळीमुळे कुणी जखमी झाले नाही. त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत बसून जवळपास अर्धा तास हा तरुण पोलिस आणि नागरीकांना पकडण्याचे आव्हान देत होता.

वर्कशॉप भागात वक्फ बोर्डाचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एऩडी़पठाण यांची तीन मजली इमारत आहे़ सध्या या ठिकाणी नुकताच अमेरिकेहून परत आलेला त्यांचा मोठा मुलगा आसिफ पठाण हा राहत होता़ या इमारतीच्या पाठीमागील बाजूस एसटीचे विभागीय कार्यालय आहे़ शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन केले आहे़ त्यासाठी परिसराची स्वच्छता करुन एका कोपऱ्यात तो कचरा जाळण्यात येत होता़ कचऱ्याचा धूर पठाण यांच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत जात होता़ त्यामुळे संतप्त झालेला आसिफ पठाण हा हातात दोन बोअरची बंदुक घेवून एसटी कार्यालयाच्या आवारात आला़ या ठिकाणी कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत त्याने वाद घालत बंदुक त्यांच्या दिशेन रोखून धरली होती़ 

यावेळी सुरक्षा रक्षक संभाजी सावंत व इतर कर्मचाऱ्यांनी आसिफला पाठीमागून धरले़ या झटापटीत बंदुकीतून एक गोळी सुटली़ गोळीच्या आवाजाने कार्यालय परिसरात धावपळ उडाली़ परंतु त्यानंतरही सुरक्षा रक्षक व काही कर्मचाऱ्यांनी हिमंत दाखवित आसिफला पकडले होते़ यावेळी आसिफने उलट्या बंदुकीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करुन आपली सुटका करुन घेतली़  यावेळी एसटीच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याचा वादही झाला़ त्यानंतर हातात बंदुक घेवून तो चालत एसटी कार्यालयाच्या आवारातून घरी गेला़ घरात गेल्यानंतर थेट दुसऱ्या मजल्यावरील खिकडीत जावून बसला़ या सर्व थरार सुरु असताना रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़ यावेळी नागरीकांनी आसिफला खाली येण्यास सांगितले़ परंतु तो नागरीकांनाच वर येण्यास सांगत होता़ थोड्याच वेळाच भाग्यनगरचे पोलिसही घटनास्थळी पोहचले़ पोलिसांनी आसिफला खाली येण्याचे आवाहन केले़ पोलिसांना पाहताच आसिफने तुम्हाला काही करणार नाही असे म्हणत वर येण्यास सांगितले़ त्यानंतर समोरील बाजूच्या दरवाजाने काही कर्मचारी दबकतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचले़ त्यानंतर आसिफने स्वताहा दरवाजा उघडत स्वताला पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी त्याच्याजवळील बंदुक जप्त केली़ 

अमेरिकेत होता नोकरीलाआसिफ पठाण हा बी़ई़इलेक्ट्रीक असून गेल्या अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी अमेरीकेत होता़ काही दिवसापूर्वीच तो नांदेडात आला होता़ वडीलांच्या नावे असलेल्या तीन मजली इमारतीत तो एकटाचा राहत होता़ त्याचे वडील एऩडी़पठाण हे वक्फ बोर्डाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते़ लाचप्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यावेळी पठाण यांच्या नावे असलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती़ त्याचबरोबर त्यांचे खातेही गोठविण्यात आले होते़ त्यामुळे आसिफलाही गेल्या काही वर्षापासून आर्थिक चणचण भासत होती अशी प्रतिक्रिया त्याच्या शेजाऱ्यांनी दिली़ 

सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांनी दाखविली हिंमतआसिफ हा हातात बंदुक घेवून शिवीगाळ करीत एसटीच्या कार्यालयाच्या परिसरात आला़ त्यावेळी आसिफने हातातील बंदुक कचरा जाळणाऱ्यांच्या दिशेने रोखली होती़ ही लक्षात येताच सुरक्षारक्षक  संभाजी सावंत यांनी त्याला मागाहून पकडले़ परंतु एकट्या सावंत यांच्यावर तो भारी पडत असताना इतर कर्मचारीही सावंत यांच्या मदतीला धावले़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ 

टॅग्स :Crimeगुन्हाfireआगNanded policeनांदेड पोलीस