शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात १ हजार १६८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:46 IST

वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांना विविध सवलती लागू केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांना विविध सवलती लागू केल्या आहेत.महसूल व वन विभागाचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०१८ अन्वये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील- १२६, लोहा- १२७, हदगाव- १४५, हिमायतनगर- ६४, किनवट- १९१, माहूर- ९२, देगलूर- १०८, मुखेड- १३५, बिलोली- ९१ तर नायगाव तालुक्यांतील ८९ याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाची पुनर्रचना, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यासह रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर तसेच टंचाईग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांतील गावांतील खातेदारांना टंचाईसंदर्भात शासनाच्या प्रचलीत धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.

टॅग्स :WaterपाणीcollectorतहसीलदारMONEYपैसाFarmerशेतकरीTaxकर