चालक, वाहकांचे वेतन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:53+5:302021-05-17T04:15:53+5:30

बसवेश्वर जयंती साजरी मरखेल - दावनगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच गंगाबाई ...

Driver, carrier's salary stagnant | चालक, वाहकांचे वेतन ठप्प

चालक, वाहकांचे वेतन ठप्प

बसवेश्वर जयंती साजरी

मरखेल - दावनगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच गंगाबाई गायकवाड, उपसरपंच श्याम नाईक, सदस्य इस्माईल शेख, जयपाल कांबळे, शेषराव बंडेवार, मारोती डावरे, ओमकार स्वामी, राजप्पा स्वामी, भास्कर बाचोटे, प्रकाश मिठ्ठेवाड, प्रसेनजित कांबळे आदी उपस्थित होते.

ईदनिमित्त घरातच नमाज

नायगाव - नरसी येथील मुस्लीम समाजबांधवांनी शासन निर्णयाच्या अधीन राहून रमजान ईद साजरी केली. मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज अदा केली. काही जण मशिदीमध्ये, तर काही मुस्लीम बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली.

परिचारिकांचा गौरव

बाऱ्हाळी- जागतिक परिचारिका दिनानिमित्त बाऱ्हाळी महिला पतंजली योग समितीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील परिचारिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी जी.पी. राजुरे, आर.ए. कांबळे, के.एन. गोरे, एम.एम. दहीकांबळे, एम.एम. अंबुलगेकर, बी.डी. कांबळे, एस.एम. बिरादार, बी.जी. पवार, अमोल डंबाळ, अब्दुल शेख, कल्पना कुलकर्णी, मनीषा पवार, चांगुना पवार यांच्यासह योगशिक्षक सन्मुख मठदेवरू, केशव रापतवार, नरसिंग अस्वले, गणेश जाधव, आनंद पवार आदी उपस्थित होते.

संभाजीराजे जयंती

नायगाव - मांजरम येथील ग्रामपंचायत कार्यालयात संभाजीराजे व महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच शोभाबाई माली पाटील, हणुमंत शिंदे, सदस्य रुक्मीणबाई शिंदे, विकास मोरे, शिवाजी शिंदे, पांचाळ, वाघमारे, भानुदास पाटील, गजानन शिंदे, विश्वंभर शिंदे, बबलू माली पाटील आदी उपस्थित होते.

वानराला वाचविले

लोहा - पार्डी शिवारातील शेतात विहिरीत पडलेल्या वानराला वनविभागाने परिश्रम घेऊन वाचविले. पाण्याच्या शोधात आलेले वानर विहिरीत पडले होते. वानराला बाहेर काढण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. मात्र, अपयश आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ही बाब वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने वानराला सहीसलामत बाहेर काढले.

लोह्यात शुकशुकाट

लोहा - लॉकडाऊनमुळे लोहा शहरात शुकशुकाट पसरला आहे. लॉकडाऊनसाठी पोलीस निरीक्षक संतोष तांबे व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरल्याने रिकामटेकड्यांची फारशी गर्दी दिसत नाही. हातगाडे, भाजीपाला, फळ विक्रेत्यांमुळे रस्त्यावर गर्दी दिसत होती. मात्र, पोलिसांनी त्यांनाही हुसकावून लावल्याने गर्दी कमी झाली आहे.

अवैध दारू जप्त

बिलोली - बिलोली तालुक्यातील अटकळी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास पोलिसांनी पकडून अटक केली. आरोपी प्रफुल्ल गंगाधर वाघमारे याच्याकडून देशी दारूच्या ९६ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. जमादार श्यामसुंदर भवानगीरकर यांनी ही कारवाई केली. रामतीर्थ पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

पाण्यासाठी भटकंती

किनवट - तालुक्यातील पळशी परिसरातील अनेक गावांत पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना फिरावे लागत आहे. पाण्याचे स्रोत खोल गेले आहेत. त्यामुळे विहिरी, विंधन विहिरींची पाणीपातळी खालावली. अनेक गावांतील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

बसवेश्वर जयंती साजरी

अर्धापूर - शहर काँग्रेस कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, उपनगराध्यक्ष डॉ. विशाल लंगडे, संचालक प्रवीण देशमुख, जिल्हा सचिव नीलेश मदने, बसवेश्वरचे सचिव पंडितराव लंगडे, माजी नगरसेवक व्यंकटी राऊत, डॉ. आनंद शिंदे, बाबूराव नागलमे आदी उपस्थित होते.

बाेगस डॉक्टरांचा सुळसुळाट

मुखेड - मुखेड तालुक्यातील बेटमोगरा परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. धामणगाव, माऊली, मोटरगा, पाळा, बावलगाव, सलगरा आदी ठिकाणी बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले असून, गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे.

तामशात रक्तदान शिबिर

हदगाव - तामसा येथील बजरंग दल सांस्कृतिक सभागृहात महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. उद्घाटन सरपंच बालाजी महाजन यांनी केले. यावेळी माजी जि.प. सदस्य दिलीप बास्टेवाड, सपोनि अशोक उजगरे, तेजस उंबरकर, ग्रा.पं. सदस्य शिवराज वारकड, सुरेश देशमुख, ज्ञानेश्वर कोडगीरवार, कोळगावचे सरपंच निळू पाटील, महेश मठपती आदी उपस्थित होते.

Web Title: Driver, carrier's salary stagnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.