दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:21+5:302021-06-01T04:14:21+5:30
यावेळी भिक्खू संघातील भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुमेध, भंते पट्टीसेन, माताजी शाक्यन ज्योती, सरपंच दगडू काकडे, ...

दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते
यावेळी भिक्खू संघातील भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुमेध, भंते पट्टीसेन, माताजी शाक्यन ज्योती, सरपंच दगडू काकडे, पोलीस पाटील भुजंगराव काकडे, माजी सरपंच प्रल्हाद काकडे, उपसरपंच दत्तराव काकडे, साहित्यिक गंगाधर ढवळे, शामराव लोणे, भुजंग लोणे, निवृत्ती लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे महामाया प्रजापती बुद्ध विहाराची स्थापना भिक्खू संघाच्याहस्ते करण्यात आली. बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना भंते सुदर्शन आणि भंते श्रद्धानंद यांच्याहस्ते केली. बुद्धविहाराचे नाव महामाया प्रजापती बुद्ध विहार असे ठेवण्यात आले. भिक्खू संघाने या बुद्ध विहारात दररोज वंदना घेतली जावी, दहा पारमिता पाळाव्यात, उपोस्थ व्रत अंगिकारावे, असे आवाहन उपस्थितांना केले.
सूत्रसंचालन भुजंग लोणे यांनी केले. प्रास्ताविक शामराव लोणे यांनी केले, तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले.