डॉक्टरांनी नातेवाईकांच्या दबावाला बळी पडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:56+5:302021-04-13T04:16:56+5:30

जिल्हाधिकारी म्हणाले, नांदेडला शेजारील जिह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. त्यामुळे ताण वाढला आहे. आपल्याला दररोज साधारणपणे ९०० व्हायल ...

Doctors should not succumb to pressure from relatives | डॉक्टरांनी नातेवाईकांच्या दबावाला बळी पडू नये

डॉक्टरांनी नातेवाईकांच्या दबावाला बळी पडू नये

जिल्हाधिकारी म्हणाले, नांदेडला शेजारील जिह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. त्यामुळे ताण वाढला आहे. आपल्याला दररोज साधारणपणे ९०० व्हायल रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत, तर गरज १५०० व्हायलची आहे. परंतु विनाकारण रेमडेसिविर लिहून देण्यात येत असल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविरनेच रुग्ण बरा होतो, असे नाही, ऑक्सिजन व इतर औषधीवरही अनेक रुग्ण ठणठणीत झाले आहेत. येत्या काही दिवसात हे सर्व सुरळीत होईल. जम्बो कोविड सेंटरसाठी तज्ज्ञ डॉक्टर लागणार आहेत. त्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांची भरती केली आहे. आयएमएशी चर्चा करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने इतर कर्मचारी भरण्यात येत आहेत. नांदेडकरानी मागील टाळेबंदीत ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच सहकार्य यावेळी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Doctors should not succumb to pressure from relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.