काँग्रेस नगरसेवकाकडून डॉक्टरास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:50 IST2020-12-04T04:50:04+5:302020-12-04T04:50:04+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. पाटील दाम्पत्य बुधवारी रात्री रुग्णालयात तपासणी करीत असताना शैलेश उल्लेवार व त्यांच्या समवेत असलेल्या ...

Doctor beaten by Congress corporator | काँग्रेस नगरसेवकाकडून डॉक्टरास मारहाण

काँग्रेस नगरसेवकाकडून डॉक्टरास मारहाण

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. पाटील दाम्पत्य बुधवारी रात्री रुग्णालयात तपासणी करीत असताना शैलेश उल्लेवार व त्यांच्या समवेत असलेल्या व्यक्तीने डॉ. पाटील यांच्या भावाच्या खरेदी केलेल्या शेताच्या सातबारा उताऱ्यावर ऐंशी हजार रुपयांचा बोजा आहे. ती रक्कम ताबडतोब देण्यासाठी हुज्जत घातली. तसेच या दाम्पत्यांना अभद्र शिवीगाळ करीत मारहाण करून रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. रात्री उशिरा याबाबत रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शैलेश उल्लेवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Doctor beaten by Congress corporator