दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:33+5:302021-04-20T04:18:33+5:30
चौकट------------ कशी करावी चाचणी? तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा. पल्स ...

दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट
चौकट------------
कशी करावी चाचणी?
तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा. पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ, स्टॉपवॉच लावून सहा मिनिटे मध्यम अथवा स्थीर गतीने फिरा. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर तुमच्या ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.
...तर वैद्यकीय सल्ला घ्या
रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांहून अधिकने कमी होत असेल आणि सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम, धाप लागत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडत आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे असले तरी वैद्यकीय सल्ल्याने तत्काळ रुग्णालयात भरती व्हा.
चौकट-------------
...तर तुमची तब्येत उत्तम आहे
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल, तर तुमची तब्येत अगदी उत्तम आहे. जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल, तरीही काळजी करण्याचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करा.
कोट--------
कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत असे वाटल्यास घरच्या घरी सहा मिनिटांची ही चालण्याची तपासणी करू शकता. याबरोबरच गृहविलगीकरणातील रुग्णांनाही ही तपासणी करता येईल. तपासणीनंतर ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावे. असे झाल्यास पुढील गंभीर आजार टाळता येऊ शकतो.
नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड.