शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:00+5:302021-04-16T04:17:00+5:30
खंदारे यांच्या भेटी भोकर - कोविडचा प्रभाव वाढू नये यासाठी शहरातील मोंढा परिसरातील दुकानांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी ...

शालेय साहित्य वाटप
खंदारे यांच्या भेटी
भोकर - कोविडचा प्रभाव वाढू नये यासाठी शहरातील मोंढा परिसरातील दुकानांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी भेटी देवून मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी महेश वाकडे, तलाठी नरेंद्र मडगुलवार, हणमंत राठीकर उपस्थित होते.
बेटकबिलोली येथे चोरी
नायगाव - तालुक्यातील बेटकबिलोली येथे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची चोरी झाली. याशिवाय अडीच तोळे सोनेही लांबविण्यात आले. शेतकरी आत्माराम पवार यांनी सालगड्याला पगार देण्यासाठी शेतमाल विकून १ लाख ८० हजार रुपये घरात ठेवले होते. मंगळवारी सालगड्याचा पगार ठरविण्यात येणार होता. चोरट्यांनी यावर हात मारला. सोबत अडीच तोळ्याचे दागिनेही लांबविले. नायगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
आंबेडकर जयंती साजरी
मुक्रमाबाद - येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक गोपीनाथ वाघमारे, वैद्यकीय अधिकारी जगदीश गायकवाड, सरपंच अंजीता बोधणे, उपसरपंच सदाशिव बोयेवाड, सदस्य बालाजी बोधणे, दादाराव गुमडे, सुनील बोयेवाड, मुन्ना सुवर्णकार, बाळू मेटकर, बालाजी मुक्रमाबादकर, संजय कांबळे, बीट जमादार शिवाजी आडेकर, अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी आदी उपस्थित होते.
विहिंपच्या वतीने रक्तदान शिबीर
बिलोली - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद शाखा बिलोलीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड, कर्मचारी अशोक स्वामी, भीम कुडके, प्रदीप भिल्लोड, नसरत बेग, शेख आंबेराय, दिलीप ढेरे, ग्रंथपाल गणेश फालके आदी उपस्थित होते.
जुगार अड्डयावर छापा
माहूर - तालुक्यातील पार्डी शिवारात ईश्वर चव्हाण यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी चौघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच रोख ७ हजार २०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पाेलीस कॉन्स्टेबल संतोष मोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद करण्यात आली.
गावठी दारू जप्त
भोकर - तालुक्यातील सोमठाणा तांडा येथील घरावर छापा टाकून २ हजार ४०० रुपयांची अवैध दारू भोकर पोलिसांनी जप्त केली. पोलीस नायक विठ्ठल ढोले यांनी या घटनेची तक्रार दिली. पोलीस तपास सुरू आहे.
अध्यक्षपदी लांडगे
उमरी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गौतम लांडगे तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ वाघमारे यांची निवड झाली. यावेळी गणेश मदने, चंद्रकांत श्रीकांबळे, गौतम सोनफळे, वसंत सवई, कैलास सोनकांबळे, शेख आरीफ, शरद मदनवाड, विशाल अचकुलवार, माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनकांबळे उपस्थित होते.
२७० जणांना लस
उमरी - तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीने २७० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी सरपंच माधव कदम, उपसरपंच संजय कदम, ग्रामसेवक श्रीकांत दुगाडे, माधवराव कदम, चंद्रकांत पाटील, शिवाजी पांचाळ, लक्ष्मण सूर्यवंशी, रमेश टोंपे, शेख गुलाम आदी उपस्थित होते. सरपंच माधव पाटील यांनी उद्घाअन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.कस्तुरे डोंगरगावकर, डॉ.मुंडे, एम.एस.मेंढे, आरोग्य सेवक ए.डी.गोडघासे, माया हणवते आदी उपस्थित होते.
कोरोना लसीकरण
मुदखेड - पाथरड रेल्वे स्टेशन येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घेण्यात आली. यावेळी सरपंच कैलास पाटील, उपसरपंच जयवंत थोरात, ग्रामसेवक एस.एस. वाघमारे आदी उपस्थित होते.