नांदेड जिल्हा परिषदेच्या पुरस्काराचे आज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:23 IST2019-02-23T00:23:31+5:302019-02-23T00:23:42+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे शनिवारी वितरण करण्यात येणार आहे़

नांदेड जिल्हा परिषदेच्या पुरस्काराचे आज वितरण
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे शनिवारी वितरण करण्यात येणार आहे़ समाजसेविका भारती आमटे, विमलताई साळवे, मंगला खिंवसरा, अंजली रावते-वाघमारे, डॉ. गीता लाठकर आणि आस्मा निखात यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे़
जिल्हा परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात. २०१२ साठी समाजसेविका भारती आमटे यांची निवड करण्यात आली आहे. २०१३ चा पुरस्कार नांदेड येथील विमलताई साळवे यांना देण्यात येणार आहे. २०१४ च्या पुरस्कारासाठी मंगला खिंवसरा, २०१५ च्या पुरस्कारासाठी अंजली रावते-वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गीता लाठकर यांना २०१६ साठी आणि २०१८ साठी आस्मान निखात यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे़