शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रौप्य महोत्सवानिमित्त बालसाहित्यावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:38 IST

महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे.

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचे आयोजन : बालसाहित्यिकांचा सहभाग

नांदेड : महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर सतत दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बालसाहित्यावर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १५ व १६ मार्च रोजी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात चर्चासत्र आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनात देश-विदेशांतील मान्यता मिळालेले बालसाहित्यिक सहभागी होणार आहेत़विद्यापीठाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात लेखिका माधुरी पुरंदरे, कथाकार राजीव तांबे, मुलांचे आवडते लेखक अनंत भावे, कवी श्रीकांत देशमुख यांच्यासह भोपाळ येथील ‘चकमक’ चे संपादक सुशील शुक्ल यांना ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या संधी आणि चित्रकला, संगीत, नाटक, व्यक्तिमत्त्व विकास, बालशिक्षण, ज्ञानरचनावाद अशा विविध मुद्यांची मांडणी राज्याच्या विविध भागांतून आलेले बालसाहित्यिक आणि समीक्षक करणार आहेत. माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते आणि कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. सुशील शुक्ल हे बीजभाषण करतील.समारोपाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. केशव देशमुख हे असतील. यावेळी राजीव तांबे, अनंत भावे, श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसांतील विविध सत्रांमध्ये नामदेव माळी, सुरेश सावंत, प्रशांत गौतम, सुभाष विभुते, विद्या सुर्वे, किरण केंद्रे, फारुख काझी, जगदीश कदम, नरेंद्र लांलेवार, देवीदास फुलारी, अनिरुद्ध गोगटे, किशोर दरक, सुनीता बोर्डे, श्रीनिवास आगवणे, संजय जोशी, माया धुप्पड, रावसाहेब जाधव, दीपा बियाणी, अर्चना डावरे, सुचिता पाटील, नाथा चितळे, दिलीप चव्हाण, माधव चुकेवाड, स्वाती काटे, शिवाजी अंबुलगगेकर, एन. सी. अनुराधा, झीनत खान, झिशान अली, पी. विठ्ठल, नीना गोगटे, योगिनी सातारकर, हमीद अश्रफ, मोहमद मकबूल अहमद, विशाल तायडे, सत्यकाम पाठक, सारिका केदार, गिरीष जकापुरे यांच्यासह विविध मान्यवर मांडणी करणार आहेत.चर्चासत्राला प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. एम. के. पाटील, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा संचालक डॉ. रवी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण आणि संयोजन सचिव डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.फ्योदर दस्तयेवस्कीच्या साहित्यावर चर्चासत्रभाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि दिल्ली येथील कॉपर कॉइन पब्लिशिंग यांच्या संयुक्त विद्यमाने फ्योदर दस्तयेवस्की (१८२१-८१) यांच्या साहित्यावर दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. ९ व १० मार्च रोजी भाषा संकुलात आयोजित करण्यात आलेले फ्योदर दस्तयेवस्की यांच्या साहित्यावरील मराठीतील कदाचित हे पहिलेच चर्चासत्र असल्याची असल्याची माहिती संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी दिली आहे. फ्योदर दस्तयेवस्की हे रशियातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे कादंबरीकार असून जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट कादंबरीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. ते क्राईम अँड पनिशमेंट (गुन्हा आणि प्रायश्चित्य) या मुख्यत: ओळखले जात असले तरी कारामाझाफ बंधू, जादुगार, द इडियट द पझेस्ट या त्यांच्या कादंबऱ्यांदेखील विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी एकूण ११ कादंबऱ्यांचे लेखन केले असून अनेक कथादेखील त्यांनी लिहिल्या आहेत. या चर्चासत्रात गणेश कनाटे (मुंबई), देवदत्त राजाध्यक्ष (मुंबई), वसंत आबाजी डहाके (अमरावती), दिवाकर आचार्य (अकोला) सहभागी होत आहेत. या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. रमजान मुलानी आणि कॉपर कॉइन पब्लिशिंगचे संचालक मनोज पाठक यांनी केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड