शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने हिरावला सुटीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:06 IST

मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र,

ठळक मुद्देबच्चे कंपनीचा हिरमोड : बोधडी परिसरात बालउद्यानाची गरज

बोधडी : मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र, ग्रामीण भागात हे चित्र पाहण्यास मिळत नाही़ शाळेला सुटी लागताच विद्यार्थ्यांना पाण्यासाठी आपल्या पालकांसोबत वणवण भटकावे लागणार आहे़ त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद हिरावला आहे़ग्रामीण भागात कुठल्याच भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्यांवर मुले घरीच राहतात़ आजच्या जमान्यात मामाकडे गावाला जाण्याची हिंमत कोणी करीतच नाही़ एकतर पाणीटंचाई, नाहीतर दरवर्षी आमच्याकडेच का यायचे, सुटीला हा प्रश्न मामी नक्कीच मामाला विचारत असेल़ त्यामुळे सुट्यात मामाच्या गावाला न जाता ग्रामीण भागातील मुले ही एकतर टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यातच अख्खा दिवस घालवतात़ बोधडीत ग्रामपंचायतने एखादे बालउद्यान उभारले तर नक्कीच बच्चे कंपनी आणि ज्येष्ठांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण होईल़ त्यामुळे बालउद्यान तयार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ग्रामीण भागातील मुलांचा पाण्यासाठी संघर्षउन्हाळ्याची सुटी म्हणजे मौज मस्ती, धमाल व आनंदाला उधाण़़़ त्यामुळे मुलांना हे दिवस खूप आवडतात़ दप्तराचे ओझे व अभ्यासाचा ताण विसरून मुले आपल्या आवडीनुसार सुटींचा आनंद घेतात़ शहरामध्ये पालक आपल्या मुलांना सुट्यांचा सदुपयोग म्हणून विविध क्लास लावतात़ विविध कार्यशाळा, शिबिरामध्ये मुले प्रवेश घेतातक़ाही मुले उन्हाळ्याच्या सुटीत सहलीवर जातात़ अशा अनेक उपक्रमांनी शहरातील मुलांच्या उन्हाळी सुट्या साजऱ्या होतात़ तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी उन्हाळी सुटीत गावी परत गेल्यानंतर आपल्या आई, वडिलांसोबत पाण्याच्या शोधार्थ भटकतात़ सुट्यांचा कालावधी म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची कसोटीचा काळ असतो़ त्यामुळे दरवर्षी येणारा उन्हाळा त्यांना नकोसा वाटतो़ यावर्षीच्या दुष्काळामुळे अनेक गावे स्थलांतरित होत आहेत़ पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या वाडी, वस्ती, तांड्यांवरील मुलांच्या सुट्याची मात्र होरपळ होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई