शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एका मिनिटांमध्ये ३ लाख ५० हजार पळवले; एटीएममध्ये रोकड भरताना चोरट्यांची 'धूम' स्टाईल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 18:26 IST

ATM Theft: छऱ्याच्या बंदुकीचा वापर करून कर्मचाऱ्यास धमकावत पळवली रक्कम 

- गोविंद टेकाळेअर्धापूर : शहरातील एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना छऱ्याची बंदूक दाखवत धाडसी चोरी केल्याची घटना आज दुपारी घडली. केवळ एका मिनिटात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपये हिसकावुन घेत स्पोर्ट बाईकवरून पळ काढला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य रस्त्यावर बसवेश्वर चौकात वानखेडे कॉम्प्लेक्स येथे इंडिया-१ हे खाजगी कंपनीचे एटीएम आहे. आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये  रोकड भरण्यासाठी  मुक्तारोद्दीन गौस महेनोद्दीन गौस ( रा.माणिकनगर नांदेड ) हा कर्मचारी आला. यावेळी दोन चोरट्यांनी एटीएम समोर स्पोर्ट बाईक उभी केली. एकजण आत गेला आणि कर्मचाऱ्यावर बंदुकीतून छऱ्याचा मारा केला. जखमी अवस्थेतील कर्मचाऱ्याच्या हातातील रोकड असलेल्या पिशवी घेऊन पळ काढत बाहेर उभ्या दुचाकीवरून पळ काढला. पिशवीत ३ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती आहे. चोरी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. चोरीची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिकक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सुचना दिल्या.पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलिस उपनिरीक्षक महमंद तयब्ब, सपो उपनि विद्यासागर वैद्ये, जमादार भिमराव राठोड,गुरूद्वारा आरेवार,महेंद्र डांगे पुढील तपास करत आहेत. 

एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरया परिसरात चोरीची ही दुसरी घटना आहे. एटीएमवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी अशी सूचना पोलिस प्रशासनाने वारंवार देऊनही संबंधितांनी कोणतीही उपाययोजना केल्या नाहीत.

या चोरी प्रकरणी पोलिस बारकाईने तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन जलदगतीने कार्य करत आहे.- विजय कबाडे, अतिरिक्त पोलिस अधिकक्षक नांदेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडatmएटीएमtheftचोरी